कारंजा(Washim):- प्रसव वेदना अनावर झाल्याने एका २५ वर्षीय महिलेने रस्त्यावरच गोंडस मुलीला जन्म (born)दिला. हा प्रकार १२ जुलै रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास स्थानिक बायपास, झांशी राणी चौकातील मानोरा रस्त्यावर घडला. यावेळी रुग्णसेवकांनी समयसुचकतेचा परिचय देत माणुसकीचे दर्शन घडविले. त्यामुळे महिला व मुलीची प्रकृती ठणठणीत आहे.
तिने रस्त्यावरच एका गोंडस मुलीला जन्म दिला
पूजा बाळू राठोड (रा.पोहा) असे प्रसूती झालेल्या मातेचे नाव आहे. प्रसूती वेदनेने(Labor pains) विव्हळत असताना दवाखान्यापर्यंत जाणे तिला अशक्य झाले. परिणामी, तिने रस्त्यावरच एका गोंडस मुलीला जन्म दिला. दरम्यान, हा प्रकार माहिती होताच येथील उपजिल्हा रुग्णालयाचे रुग्णसेवक तथा समृद्धी रुग्णवाहिकेचे(Ambulance) अजय घोडेस्वार, श्याम घोडेस्वार, छोटू उके, प्रसन्ना काळबांडे, सर्वधर्म आपत्कालीन संस्था व आस आपत्कालीन संस्थेचे श्याम सवाई, रमेश देशमुख, प्रहार रुग्णवाहिकेचे शिवम खोंड, वेदांत रुग्णवाहिकेचे शंकर रामटेके, विळेगाव रुग्णवाहिकेचे अमोल गोडवे, धनंजय राठोड यांनी तातडीने घटनास्थळ गाठून महिला व नवजात मुलीला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता आणून माणुसकीचे दर्शन घडवले. येथे डॉक्टरांनी आई व मुलीची वैद्यकीय तपासणी (Medical examination) करून ते सुखरूप असल्याचा अहवाल दिला. तत्पूर्वी, सास कंट्रोल रूमला (control room) व त्यांच्या वन सेकंद वन कॉल न्यू लाइफ अभियान या अभियानाला प्रथम दर्शनी व्यक्तीने आपले कर्तव्य लक्षात घेऊन तात्काळ मदतीसाठी फोन केला व त्याच्या एका फोनमुळे महिला व बाळाचे प्राण सुखरूप झाले, हे येथे उल्लेखनीय .