कर्मचार्यांचा अभाव, रुग्णांची गैरसोय; २४ तास सेवा नावालाच
बारव्हा (Barwa Health Center) : लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे कर्मचार्यांच्या रिक्त पदामुळे सलाईनवर असल्याचे दिसून येत आहे. हे आरोग्य केंद्र नावालाच २४ तास सेवेचे असले तरी डॉक्टरसह अन्य कर्मचार्यांची पदे रिक्त असल्याने याचा परिणाम रुग्ण सेवेवर होत आहे. परिणामी रात्री दरम्यान आलेल्या (Barwa Health Center) रुगावर उपचाराविनाच परतावे लागत आहे.
तर कधी कधी रात्री दरम्यान इतर केंद्रातील डॉक्टरांना येथे कर्तव्यावर ठेवले जाते. जर डॉक्टरसह अन्य कर्मचार्यांचे पद रिक्त असतील तर करोडो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या आरोग्य केंद्राचा काय उपयोग? असा प्रश्न जनतेला पडला आहे.
गोर गरीब आदिवासी जनतेला कमी खर्चात व वेळेवर उपचार मिळावे. या हेतूने बारव्हा येथे (Barwa Health Center) प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. आरोग्य केंद्राची इमारत व निवासस्थान बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने गावातीलच गिरीधर कापगते नामक व्यक्तीने स्वत:ची शेतजमीन शासनास दान दिली. त्या जागेवर हे प्राथमिक आरोग्य केंद्र व निवासस्थान करोडो रुपये खर्च करून बांधन्यात आले. या आरोग्य केंद्रात एकूण २१ पद मंजूर असून त्यापैकी १२ पद रिक्त आहेत. यात वैधकीय अधिकारी २, आरोग्य सेविका ५, परिचर २, आरोग्य सेवक २, सफाई कामगार १ असे एकूण १२ पद रिक्त आहेत.
या रिक्त पदाचा फटका केंद्रात आलेल्या रुग्णांना बसत आहे. पाच वर्षांपूर्वी या आरोग्य केंद्रात रात्री बेरात्री कितीही वाजता रुग्णांना उपचार मिळत होते. त्यामुळे येथे रोजच २०० ते २५० रुग्ण उपचारासाठी यायचे. मात्र सध्या स्थितीत २१ पैकी १२ पद रिक्त आणि त्यातही डॉक्टरसह, आरोग्य सेविका, सेवक, यांची पद रिक्त असल्याने आलेल्या रुग्णावर उपचार करणार कोण? बारव्हा येथे (Barwa Health Center) आरोग्य केंद्र असल्याने रात्री बेरात्री रुग्ण येतात. मात्र त्याच्यावर उपचार होत नसल्याने या केंद्राचा फायदाच काय? असा सवाल जनता करीत आहे. आठ दिवसापूर्वी एका बीएएमएस महिला डॉक्टरची या केंद्रात नियुक्ती करण्यात आली. त्या एकाच महिला डॉक्टरच्या खांद्यावर दिवसा व रात्रीची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती आहे. तरी शासन प्रशासनाने, जनप्रतिनिधीनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रिक्त पदे तात्काळ भरावी. अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रुग्णाचे हाल, कर्मचार्यांचा अभाव, पण केंद्रात विकासकामे सुरु
बारव्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Barwa Health Center) कर्मचार्यांचा अभाव असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. रुग्णाचे हाल होत आहेत. कर्मचार्यांचे रिक्त पद भरा म्हणून नागरिक बोंबा ठोकत आहेत. मात्र अशी परिस्थिती असतानासुद्धा लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही. मात्र शासनाकडून या केंद्रात कामाची गरज नसतानाही वारंवार तेच तेच काम एकाच जागेवर दुरुस्तीच्या नावाखाली कसे काय मंजूर करण्यात येतात आणि हे कुणाच्या फायद्यासाठी? हे न समजणारे कोडेच आहे.
बारव्हा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २० गावाचा समावेश आहे. तसेच आजूबाजूला अनेक गावे आहेत. या सर्व गावातील गोर गरीब रुग्ण येथे रात्री बेरात्री, दिवसा उपचाराकरिता येत असतात. मात्र बरेचदा या (Barwa Health Center) केंद्रात स्थायिक डॉक्टर व कर्मचारी यांची नियुक्ती न करण्यात आल्याने त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. तसेच उपचाराविना परतावे लागत असल्याचे वास्तव सत्य आहे. शासनाने या आरोग्य केंद्रात रिक्त पदाचा त्वरित भरणा करून रुग्ण सेवा सुरळीत करावी. जर पदे भरण्यात आली नाही तर भविष्यात मोठे आंदोलन उभे करू!
– रतन थाटकर, लाखांदूर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी पक्ष