पोलिसांनी ४ गुन्हे दाखल केलं दाखल डीजे सिस्टिम जप्त
परभणी (Parbhani Pola) : पाथरी तालुक्यात न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याप्रकरणी पाथरी पोलिसांनी शुक्रवारी बैलपोळा सणाच्या दिवशी धडक कारवाई केली. पाथरी तालुक्यात पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत चार गुन्हे दाखल केले असून, यामध्ये डीजे आणि साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आली आहे.
बैलपोळा सणाच्या (Parbhani Pola) निमित्ताने तालुक्यात अनेक ठिकाणी डीजे सिस्टिमचा वापर केला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. जिल्हाधिकारी कार्यालयाने डीजेवर बंदी घालणारे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे पालन न केल्याने पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांच्या नेतृत्वात पाथरी पोलिसांनी कठोर भूमिका घेत कारवाई सुरू केली. या कारवाईत पोलिसांनी भाऊजी रेणापूर, सोनपेठ टी-पॉईंट माळीवाडा व वाघाळा गावांमध्ये डीजे वाजवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पोह .अमोल जयस्वाल यांच्या फिर्यादीनुसार रेणापूर येथे भैय्यासाहेब वाकोडे या आरोपीवर डीजे वाजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक शिवसांभईश्वर स्वामी यांच्या तक्रारीनुसार,वाघाळा गावात गजानन वसंत आणि मोहन घाडगे या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोह . अशोक झमकडे यांच्या फिर्यादीनुसार सोनपेठ टी-पॉईंटवर अशोक चव्हाण या आरोपीवर डीजेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तर पोलीस कर्मचारी सुधाकर राऊत यांच्या फिर्यादीनुसार माळीवाडा येथे अरबाज पठाण, लखन राजपूत या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस हवालदार शितोळे, बालाजी लटपटे आणि थोरे पुढील तपास करीत आहेत .
न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये डीजे वाजवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. (Parbhani Pola) नागरिकांनी उत्सवांमध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. आगामी सण-महोत्सवांमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमात डीजे वाजवल्यास कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
– पोलीस निरीक्षक महेश लांडगे