Yawatmal Crime :- संभाजी नगर येथे चोरी झालेले साहित्य चोरट्यांनी आपल्या घराच्या आवारात लपून ठेवला असल्याची गोपीनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला शहरात पेट्रोलिंग करत असतानां मिळाली मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नी. संतोष मनवर व स्थानिक गुन्हे शाखेची टिम अंबा नगर परिसरात पोहचली.
चोरटे पोलिसांच्या जाळ्यात; पोक्सो आरोपीसह दोघांची अटक
त्या ठिकाणी दोन इसम संशयास्पद(Suspicious) रित्या फिरताना आढळून आले. स्थानिक गुन्हे शाखेचा (Local Crime Branch) पथकाने संबंधितांना नाव विचारले असता. अंकुश ज्ञानेश्वर इंगोले रा. आंबा नगर दारव्हा रोड. शंतनु सुरेश जुमडे रा. यांना विचारपूस केली असता आरोपीनी १ ऑक्टोंबर रोजी रात्री संभाजीनगर येथील एका घराच्या शेडमध्ये मध्ये ठेवलेली वाहनाची बॅटरी व इतर सामानाची चोरी केले असून हे समान अंकुश इंगोले याच्या घरी ठेवले असल्याची माहिती दिली. याप्रकरणी लोहारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या घराची पाहणी केली असता आरोपीच्या घरी चोरीचे साहित्य एकुण ५७ हजार रुपयाचे आढळून आले.
या प्रकरणातील आरोपी शंतनु सुरेश जुमळे हा पोक्सो (POCSO)कायद्याच्या अंतर्गत गुन्हा करून फरार होता या चोरीच्या प्रकरणात तो पोलिसांच्या हाती लागला आहे . ही कारवाई स्थानिक गुणे शाखेचे स.पो. नी. संतोष मनवर, स.फौ. योगेश गटलेवार, पो.ह.वा. प्रशांत हेडावू, सचिन घुगे, रितुराज मेडवे, पो.शी आकाश साहारे यांनी केली आहे . याप्रकरणी निलेश राठोड स्था.गु.शा. यांनी फिर्याद दिली आहे.