आरोपी राजकीय पाठबळाच्या शोधात!
उमरखेड (Theft Case) : महागाव रोडवरील सदभाव कॅम्पमधून गावर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अंदाजे 1.6 कोटी रुपये किंमतीच्या सात गाड्या चोरी प्रकरणात आता नवा मोड आला आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास उमरखेड पोलीस ठाण्याच्या (Umarkheed Police Station) अधिकार्यांकडून काढून घेण्यात आला असून, आता पुसदचे उपविभागीय अधिकारी हर्षवर्धन बिजे यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. त्यामुळे या चोरीप्रकरणातील (Theft Case) मूळ सूत्रधार आणि मास्टरमाइंड (Mastermind) आरोपींचा छडा लावला जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आरोपींनी अटकसत्राच्या भीतीने सैरभैर होऊन काही मुद्देमाल परत केला!
दरम्यान, या गुन्ह्यात ज्या धर्मेंद्र (गुजरात), विनिमय पांडे (उत्तरप्रदेश), मोहम्मद शेख महेबूब अली (तेलंगणा), व नंदू राठोड (उमरखेड) यांचा सहभाग असल्याचा ठपका आहे, त्यांच्याविरोधात गुन्हा क्रमांक 562/2025 नुसार कलम 303(2), 3(5) बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. गुन्हा उघडकीस येताच गाड्या परत आणण्यात आल्या असून, आरोपींनी अटकसत्राच्या भीतीने सैरभैर होऊन काही मुद्देमाल परत केला आहे, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
संपूर्ण तालुक्याचे लक्ष या तपासाकडे!
विशेष म्हणजे, या आरोपींनी स्वतःला वाचवण्यासाठी काही राजकीय नेत्यांचा आधार घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासात राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता गडद झाली आहे. नवीन तपास अधिकारी बिजे यांच्यासमोर आता आव्हान उभे ठाकले आहे–मूळ मास्टरमाइंडला अटक करून न्याय देण्याचे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता असून, संपूर्ण तालुक्याचे लक्ष या तपासाकडे लागले आहे.
सदभाव कॅम्प मधील कंपनी मालकीच्या संपत्ती ची लूटपाट झाली हा तपास सुरु असुन, लवकरच पुढील कार्यवाही होईल.
– हर्षवर्धन बिजे उपविभागीय पोलीस अधिकारी




