परभणी (Theft of Sand) : परभणीतील पाथरी तालुक्यातील मरडसगाव येथील गोदावरी नदी पात्रात सोमवारी रात्री पाथरी पोलिसांनी वाळू चोरीवर कारवाई करत, तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन ट्रॅक्टर जप्त केले. ही मोहीम पोलिस निरीक्षक महेश लांडगे (Police Inspector Mahesh Landge) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि घायवट व पथकाने केली.
सोमवार 12 मे रोजी झालेल्या, पहिल्या कारवाईत शिवाजी तोंडे याच्याकडून अंदाजे 7 लाखांचा जॉन डिअर ट्रॅक्टर, दुसऱ्या कारवाईत राम शिंदे याच्याकडून 6.5 लाखांचा ट्रॅक्टर, तर तिसऱ्या कारवाईत मधुकर लोखंडे याच्याकडून 7 लाखांचा सोनालिका ट्रॅक्टर जप्त (Tractor Confiscated) करण्यात आला. एकूण अंदाजे 20.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत (Action) सपोनि घायवट, पो. ना. सुरेश कदम, पोह. अशोक धस, ब्रह्म कोल्हे, रामेश्वर घुगे यांचा सहभाग होता.