गोरेगाव (Goreshwar Shiv Mandir) : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील ग्रामदैवत गोरेश्वर शिव भगवान मंदीरातील शिवपींडीवर विराजीत असलेल्या तांब्या धातुची नागदेवता १ ऑक्टोबर रोजी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना घडली आहे. सदर नाग देवता मुर्ती कुणाकडे विक्रीस आल्यास संस्थान कमेटी अध्यक्ष संतोष पाटील गोरेगावकर यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.
गोरेगाव येथील ग्राम दैवत गोरेश्वर शिवभगवान भाविकांचे श्रद्धास्थान आहे. (Goreshwar Shiv Mandir) मंदीर जिर्णोद्धाराचे कार्य संस्थान कमेटीचे अध्यक्ष संतोष नाथराव पाटील यांनी कमेटी सदस्य व गावकर्यांच्या सहभागातुन पुर्ण केले आहे. सुशोभित मंदीराची ईमारत उभी राहिली असुन मंदीर गाभा-यात प्राणप्रतिष्ठीत शिव भगवान पींडीला पंचधातुच्या रेखीव सुंदरतेने सजविलेले आहे पिंडीवर तांब्या धातुची नागदेवता विराजीत करण्यात आली होती. १ ऑक्टोबर रोजी दुपारच्या नतंर मंदीरात अज्ञात चोरट्यांने लंपास केली. ही मुर्ती बाहेर कुणीही विक्रीस आनल्यास (Goreshwar Shiv Mandir) गोरेश्वर शिव भगवान मंदीर कमेटी अध्यक्ष संतोष पाटील गोरेगावकर यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.