परभणी(Parbhani) :- कार समोर दुचाकी लावून कार आडवून अश्लिल शिवीगाळ (Obscene abuse) करत थापडबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच एकाच्या गळ्यातील दिड लाखाची सोन्याची चैन (Chain of gold) आणि महिले जवळील २० हजारांची रोकड बळजबरीने काढून घेण्यात आली. दगडाने मारुन कारचे देखील नुकसान करण्यात आले. ही घटना ५ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास वसमत रोडवरील किसान बेकरी जवळ घडली. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन थापडबुक्क्यांनी मारहाण
किशन वाघमारे हे कारने जात असताना दोन अज्ञातांनी त्यांच्या कार समोर मोटारसायकल लावली. फिर्यादीला अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन थापडबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीच्या कारवर दगड मारुन समोरील काच फोडले. फिर्यादीच्या बहिणीजवळील पर्स हिसकावून त्यातील २० हजार रुपये बळजबरीने घेतले. तसेच फिर्यादीच्या गळ्यातील दिड लाख रुपये किंमतीची सोन्याची चैन बळजबरीने काढून घेतली. या घटनेत कारचे देखील ४७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वर्दळीच्या ठिकाणी घटना घडल्याने मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला. यानंतर नवा मोंढा पोलीस ठाणे गाठत दोन अज्ञातांविरुध्द तक्रार देण्यात आली आहे. तपास सपोनि. बी.आर. बंदखडके करत आहेत.