दिग्रस (Yawatmal) :- तालुका हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून असून तालुक्यात मुख्यत: कापूस, सोयाबीन, तूर, मिरची अशी अनेक पिके घेतली जातात. मात्र कापूस पीक हे सर्वात जास्त प्रमाणात घेतले जाते. याचाच फायदा घेत अनाधिकृत चोर ‘उत्तम’ बीटी कापूस (Cotton) बियाण्याचा दुकानातुन छुप्या मार्गाने विक्री होत असल्याचे बोलले जाते. यात अनेक प्रकारचे बियाणे आहे.
खताची फवारणी केल्याने त्या फवारणीचा झाडावर कोणताच प्रभाव राहत नाही
शेतकर्यांच्या चर्चेनुसार खुले बियाणे तीन हजार रुपये, प्रति किलो, तर पाकीट एक हजार रुपये पाचशे ते सातशे रुपये अंदाजित किंमती आहे. सर्रासपणे चोर बीटी बियाण्याची विक्री होत असताना तालुक्यातील कृषी विभाग गप्प का? असा प्रश्न निर्माण होत असून याकडे कृषी विभागाचे (Department of Agriculture) दुर्लक्ष होत असल्याची चर्चा गावागावातील जनमानसात सुरू आहे. अनाधिकृत चोर बीटी कापूस बियाणे हे बाहेरील राज्यातून छुप्या मार्गाने आणून विक्रेत्याकडून शेतकर्यांना मोठी आश्वासने देण्यात येते. यामध्ये या बियाणाचा कापूस हा वजनदार आहे. वर खताची फवारणी केल्याने त्या फवारणीचा झाडावर कोणताच प्रभाव राहत नाही. उत्पन्न वाढतो असे अनेक भुलथापा सेवा कृषी केंद्र चालकांकडून देऊन चोर बीटी बियाण्याची विक्री केली जात आहे. अनधिकृत चोर बीटी कापूस बियाणास शासनाची परवानगी नाही. परंतु छुप्या मार्गाने हे बियाणे शेतकर्यांना विक्री करून शेतकर्यांची फसवणूक (Fraud) केली जाते.
जर का सदर बियाणे उगवलेच नाही. तर शेतकर्यांना त्याबाबत दादाही मागता येणार नाही. व त्याचा पूर्ण वाया जातो आणि शेतकर्यावर पेरणीची वेळ येते म्हणजेच शेतकर्यांना डबल बियाणे घेऊन परत पेरणी करावी लागते. यात त्याचा शेतकर्यांना मोठा फटका बसू शकतो तसेच याचा जमिनीवर व पर्यावरणावर देखील दुष्परिणाम होतो. संबंधित अधिकार्यांनी धाडस दाखवून जर का सेवा कृषी केंद्राच्या गोडावून वर छापे टाकले. तर विक्रेत्यांना दिवसा आकाशात तारे दिसणार एवढे मात्र निश्चित…!