Yawatmal :- नगर परिषद (City council)निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दहा नगर परिषदेच्या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर चुका व विसंगती झाल्याचे उघड झाले आहे. अनेक पात्र मतदारांची नावे वगळल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तर अनेक नागरिकांचे मतदान स्वतःच्या प्रभागातून दुसर्या प्रभागात गेलेले असल्याने मतदारयादीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.
उमरखेड नगर परिषदेत ४ हजार २३८ आक्षेप आले आहे
८ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील दहा नगर परिषदेच्या प्रभागातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती तर १४ ऑक्टोबर रोजी या यादीवर आक्षेप घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र मतदार यादीतील गोंधळ बघाता १७ ऑक्टोबर पर्यंत मतदार यादीवर आक्षेप घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. शुक्रवारी आक्षेप घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील नगर पालिकेच्या (Municipalities) प्रारूप मतदार यादीवर आलेले आक्षेप मतदार यादीतील गोंधळ स्पष्ट करत आहे. जिल्ह्यातील यवतमाळ नगर परिषद मध्ये प्रारूप मतदार यादीवर सर्वाधिक आक्षेप घेण्यात आले असून आक्षेपांची संख्या ४ हजार ६०९ असून मतदार यादीवर आक्षेपा बाबतीत दुसर्या क्रमांक उमरखेड नगर परिषदचा क्रमांक लागतो आहे. उमरखेड नगर परिषदेत ४ हजार २३८ आक्षेप आले आहे.
प्रारूप मतदार(voter) यादी मध्ये झालेल्या गोंधळामुळे इच्छुक उमेदवारांन सह प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आता यातील किती आक्षेप मंजूर होणार हे पहावे लागणार आहे ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.