Pandharkawda :- १२ रोजी पोलीसांनी रेती तस्करी करीत असलेल्या वाहनांसह त्या वाहनाची पायलटिंग करणार्या वाहनांना सुध्दा ताब्यात घेवुन साडेतिन ब्रास रेती जप्त केली. पोलीसांनी सदर कार्यवाहीमध्ये १२ लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सहा जणांविरुध्द गुन्हे दाखल केले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरु आहे. हि तस्करी रोखण्याएैवजी तहसिलदार व महसुल विभागातील (Department of Revenue) काही संधीसाधु कर्मचारी त्यातुन आर्थीक उन्नती साधत आहे.
पोलीसांनी सापळा रचुन केळापुर येथे आरोपींना केले ताब्यात
पोलीसांना अवैद्य रेतीची वाहतुक सुरु असल्याची माहिती मिळाली होती. पोलीसांनी सापळा रचुन केळापुर येथे मॅक्स पिकअप वाहन क्रमांक एम एच ३७ टि ३५५२ यास अडवुन चालक अभय जयपाल मेश्राम २१, मजुर लिलाराम उर्फ सोनु संजय कोल्हे ३८, पंकज मोरेश्वर किनाके २५ यांना ताब्यात घेवुन रेती बाबत अधिक विचारपुस केली असता, त्यांनी रेतीचे वाहन अर्थव गजानन जिड्डेवार यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले. या रेतीच्या वाहनाची पायलटिंग देव गणेश बागड हा विना नंबरच्या अॅक्टीव्हा गाडीने करीत असल्याचे सांगत सदर रेती पाटणबोरी येथील रमेश हनमंतु मिरेलवार ३२ याच्या जवळील साठ्यातुन आणल्याची त्यांनी कबुली दिली. तेव्हा पोलीसांनी मिरेलवार यांच्या जवळुन अवैद्य रेतीकरीता (illegal sand) वापरलेली स्विप्ट डिझायर वाहन क्रमांक एम एच २७ बिई ०६९७ सुध्दा ताब्यात घेतली. पोलीसांनी वरील सर्व आरोपी विरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करुन मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कार्यवाही सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल, पोलीस निरिक्षक दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय नितिन सुशीर, स्वप्नील कावरे, पोलीस कर्मचारी राजु गेडाम, राजु बेलयवार आदिंनी केली आहे.