मुख्य आरोपीसह दोघांना अटक; एका आरोपीला न्यायालयीन कोठडी
आखाडा बाळापूर/हिंगोली (Yedsi Ashram School) : कळमनुरी तालुक्यातील येडसी तांडा (Yedsi Ashram School) येथील भोजाजी नाईक आश्रम शाळेच्या कार्यालयामध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्या प्रकरणी, आखाडा बाळापूर पोलिसात दोन शिक्षकांवर बुधवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाची संस्था चालक अॅड. संतोष राठोड यांनी गांभीर्याने तातडीने दखल घेत मुख्याध्यापकासह तिघांना निलंबित केले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार येडशीतांडा भोजाजी नाईक प्राथमिक आश्रमशाळेत १३ ऑक्टोंबर रोजी रात्री १० वाजता एका अल्पवयीन विद्यार्थिनीला तु जेवायला व माझ्या सोबत कार्यालयामध्ये चल असे म्हणून तिला कार्यालयात नेऊन तिचा विनयभंग केला. या प्रकरणात आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात १५ ऑक्टोंबर बुधवार रोजी दिलेल्या फिर्यादीवरून (Yedsi Ashram School) आश्रम शाळेतील शिक्षक महालिंग पटवे व मोहन जाधव यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या (Yedsi Ashram School) प्रकरणी संस्थेने या प्रकरणाची ंगंभिरतेने दखल घेऊन तातडीने कठोर पावले उचलून रात्रपाळी असणारा सहशिक्षक महालींग विश्वनाथ पटवे याने विद्यार्थींनी सोबत अश्लील वर्तन करून विनयभंग केला या आरोपावरून व वस्तीगृह अधिक्षक मोहन प्रकाश जाधव व मुख्याध्यापक या नात्याने दोघांनी बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणा केला. तसेच वस्तीगृह विद्यार्थ्यांची संरक्षण करण्यासाठी अकार्यक्षम असणारे व्यंकटेश बालाजी गुठ्ठे या तिघांना तातडीने निलंबित करून महाराष्ट्र मागास वर्ग सेवा संघ येडसी अध्यक्ष अॅड. संतोष राठोड यांनी याबाबत अहवाल सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कार्यालय हिंगोली यांना अहवाल १५ ऑक्टोंबर रोजी तातडीने सादर केला आहे.
दोन आरोपींना पोलिसांनी पकडले
येडशी तांडा भोजाजी नाईक प्राथमिक आश्रम शाळेतील (Yedsi Ashram School) अधिक्षक मोहन जाधव याला १५ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक गणेश गोटके, शेख अन्सार, शिवाजी पवार, राजू घोंगडे, परमेश्वर सरकटे, जमादार शेख बाबर यांच्या पथकाने अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली. जामीनसाठी अर्ज दाखल केला असता त्याची जामीनवर सुटका करण्यात आली.या गुन्ह्यातील मुख्य आरोपी महालिंग विश्वनाथ पटवे यालाही आखाडा बाळापूर पोलिसांनी रात्रीला अटक केली.