Karanja Accident :- नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway)अपघाताच्या दोन घटना घडल्या. त्यात तीन युवक जखमी झाले. मुंबई कॉरिडोर चॅनेल 186 व 195 वर या अपघाताच्या (Accident) घटना घडल्या. अपघाताची पहिली घटना 17 जुलै रोजी रात्री साडे 12 वाजता च्या दरम्यान समृद्धी महामार्गावरील चॅनल 195 घडली.
उभ्या ट्रकला धडक बसल्याने घडला अपघात
या घटनेत रायपूर वरून जालना येथे जाणाऱ्या ट्रकने समोरील ट्रकला मागून धडक दिली. यावेळी चंदू निषाद वय 28 वर्ष व मनीष साहु वय 22 वर्ष हे दोघेजण जखमी झाले. अपघाताची दुसरी घटना मुंबई कॉरिडॉर चॅनेल 186 वर 17 जुलै रोजी पहाटे 6 वाजताचे दरम्यान पडली. या घटनेत एम एच 32 क्यू 2190 क्रमांकाचा भरधाव महेंद्रा टेम्पो च्या वन्यप्राणी आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या नादात टेम्पो पलटी झाला आणि तो चालकाच्या हातावर पडला त्यामुळे चालक गंभीर जखमी झाला. प्रवीण किसनजी पूरजेकर असे जखमी चालकाचे नाव असून तो वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील रहिवासी असल्याची माहिती रुग्णालयातील नोंदीवरून प्राप्त झाली आहे. अपघाताच्या घटनांची माहिती मिळताच समृद्धी 108 रुग्णवाहिकेचे पायलट रवी उर्फ सोनू शिंदे आणि डॉ. गणेश यांनी जखमींना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील प्राथमिक उपचारानंतर यातील दोघांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले तर एकाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले.




