झंजेरिया बिट मधील घटना
हरदोली/सिहोरा (Tiger Hunting) : तालुक्यात वाघाच्या हल्ल्यांची मालिका सुरूच असून, दि. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता दरम्यान झंजेरिया वनपरिक्षेत्रातील बिटमध्ये एका वाघाने म्हशीची शिकार केल्याची घटना समोर आली आहे. या (Tiger Hunting) घटनेमुळे परिसरातील पशुपालक आणि शेतकरी वर्गात भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुमसर तालुक्यातील झंजेरिया बीटमध्ये साखळी येथील शेतकरी गोखल बिसने यांची म्हैस चरायला गेली असतांना वाघाने तिच्यावर हल्ला केला. वाघाने केलेल्या हल्ल्यात म्हशीचा जागीच मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तुमसर आणि परिसरातील वनक्षेत्रात वाघांचा मुक्त संचार वाढला आहे. त्यामुळे जंगलानजीकच्या गावांमध्ये भीतीचे सावट आहे. विशेषतः शेतकरी आणि पशुपालक आपल्या जनावरांना घेऊन शेतात जातांना किंवा जंगलात चरायला सोडतांना दहशतीत आहेत. या (Tiger Hunting) घटनेमुळे साखळीसह झंजेरिया परिसरातील इतर पशुपालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. एकीकडे नैसर्गिक संकटामुळे शेतीचे नुकसान होत असतांना, दुसरीकडे वाघाच्या हल्ल्यामुळे उपजीविकेचे साधन असलेल्या जनावरांना जीव गमवावा लागत आहे.
या (Tiger Hunting) घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकर्याने तातडीने वन विभागाकडे संपर्क साधून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. उपजीविकेचे साधन गमावलेल्या या पशुपालकाला तातडीने आणि नियमानुसार योग्य भरपाई मिळावी, अशी मागणी साखळी च्या पं.स.सदस्य आम्रपाली पटले यांनी केली आहे. वन विभागाने या परिसरात गस्त वाढवून वाघाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा घालता येईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.