माडगी चौकातील घटना
माडगी (Tipper Accident) : तुमसर-गोंदिया राज्य मार्गावरील माडगी चौकात दोन टिप्परची धडक झाल्याने मागील टिप्परचालक जखमी झाल्याची घटना दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.४० वाजताच्या सुमारास घडली. (Tipper Accident) सदर दोन्ही टिप्पर एकाच मालकाचे असल्याने नाव सांगण्यात आले नाही.
तुमसरकडून तिरोडा-गोंदियाकडे बद्री गिट्टी भरून जात असलेला टिप्पर क्र.एम.एच.४०/बी.एफ.५११७ समोर जात होता तर मागेहून टिप्पर क्र.एम. एच.४०/बी.एल.५११७ टिप्पर चालकाचे लक्ष नसल्याने समोरील टिप्परला धडक दिली. त्यात मागील टिप्परचालक स्टिअरिंगमध्ये पूर्ण अडकलेला होता. पण अगदी (Tipper Accident) मुख्य मार्गावर चौकातील घटना घडल्याने अनेक नागरिक बाचावाकरिता धावले अन् चालकाला बाहेर काढण्यात आले. जखमी झाले उपचाराकरिता नेण्यात आले पण अजूनही नाव सांगण्यात आले नसून दोन्ही टिप्परचा मालक एकच आहे असे सांगण्यात आले.