तिवसा (Tivasa Water Supply Yojana) : नगरोत्थान अभियानांतर्गत सादर करण्यात आलेल्या (Tivasa Water Supply Yojana) तिवसा नगरपंचायत पाणीपुरवठा योजनेला 27.91 कोटी रुपयांचा निधी महायुती शासनामुळे व भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाला आहे.याचे सर्व श्रेय मुखमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनाच आहे. यशोमती ठाकुर पालकमंत्री असतांना त्यांना जे जमले नाही ते आमच्या पाठपुराव्यामुळे महायुती सरकारने केले म्हणुन आता यशोमती ठाकुरांनी (Yashomati Thakur) फुकटचे श्रेय लाटु नये, असे भाजपाच्या नेत्या निवेदिता चौधरी (Nivedita Chaudhary) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
यशोमती ठाकूरांनी फुकटचे श्रेय लाटु नये
तिवसा शहराच्या पाणी पुरवठा योजनेचा (Tivasa Water Supply Yojana) प्रस्ताव महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणुन मार्च 2024 मध्ये निवेदिता चौधरी (Nivedita Chaudhary) यांच्यासह तिवसा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत मागणी केली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना आपणच मार्गी लावू असा शब्द दिला होता. याची कुणकुण यशोमती ठाकुर यांना लागल्यामुळे पुरावे तयार करुन श्रेय लाटण्यासाठी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करायला लावले व आता आपल्या आंदोलनामुळेच महायुती सरकार नमले असल्याची आवई उठविण्यात येत आहे.
तिवसा पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर
ठाकुराच्या आंदोलनामुळे शासन नमुन योजना मंजूर करीत असल्यास (Tivasa Water Supply Yojana) तिवसा विधानसभा मतदारसंघात अनेक समस्या ठाकुर पंधरा वर्षापासुन आमदार असल्यावरही सोडवू शकल्या नाही त्याबद्दल मग यशोमती ठाकुर यांनी आंदोलन करावे म्हणजे तिवसा मतदारसंघातील समस्या आपोआप सुटतील असा टोमणा सुध्दा भाजपाच्या नेत्या निवेदिता चौधरी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात (Yashomati Thakur) यशोमतींना मारला आहे. तिवसा पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने निधी मंजूर केल्याने तिवसा नगरपंचायतीतील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. योजना मंजूर केल्याबद्दल निवेदिता चौधरी यांनी मुखमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांचे आभार मानले आहे.