लातूर (Pahalgam Terrorist Attack) : श्रीनगर येथे पर्यटनासाठी गेलेले औसा तालुक्यातील शिवली येथील एकाच कुटुंबातील तिघेजण सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली असून शुक्रवारी, 25 एप्रिल रोजी ते विमानाने परतणार आहेत. दरम्यान मनसे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांनीही त्या तिघांची चर्चा केल्याचे म्हटले आहे. औसा तालुक्यातील शिवली येथील चिखले कुटुंबातील तिघेजण कालपासून श्रीनगर (Pahalgam Terrorist Attack) येथे असून सर्वजण सुखरूप आहेत.
पहलगाम येथील (Pahalgam Terrorist Attack) अतिरेकी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांविषयी सर्वत्र माहिती घेतली जात त्या अनुषंगाने औसा तालुक्यातील शिवली येथील दिघेजण श्रीनगरमध्ये असल्याची माहिती प्रशासनाने दिली. दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी ते विमानाने परतणार आहेत. सातलिंग राजाराम चिखले, ज्योती सातलिंग चिखले व जिजा सातलिंग चिखले अशी त्यांची नावे आहेत.
दरम्यान हे तिघेजण शिवली येथील रहिवासी असून आपण त्यांच्याशी संपर्क साधला असल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांनी म्हटले आहे. श्रीनगर येथे सध्या ते एका हॉटेल आत मुक्कामाला असून ते सर्वजण सुखरूप असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Pahalgam Terrorist Attack) याबाबत आपण लातूरच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र उपविभागीय अधिकारी तसेच अंशाचे तहसीलदार यांना याबाबत कळविण्याचे नगराळे यांनी म्हटले आहे.