प्रशासकीय व विनंतीवरून बदल्या 
सीईओ नतिशा माथुर यांचा पारदर्शक कारभार
परभणी (Parbhani Zilla Parishad) : येथील जिल्हा परिषद मधील जिल्ह्यातील कर्मचार्यांच्या प्रशासकीय व विनंती अर्ज बदल्या सीईओ नतिशा माथूर यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या. एकूण ८५ कर्मचार्यांच्या बदल्या झाल्याची माहिती सामान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी दिली.
परभणी जिल्हा परिषद (Parbhani Zilla Parishad) अंतर्गत जिल्ह्यातील सर्व विभागात प्रशासकीय कारणावरून व विनंती अर्जावरून बदल्या दरवर्षी केल्या जातात. या बदलांच्या प्रक्रियेत यापूर्वी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत होती. परंतु मागील काही वर्षांपासून बदल्यांच्या प्रक्रियेत पारदर्शकता वाढत चालली आहे. यावर्षी देखील जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या मागील तीन दिवसापासून करण्याची प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यांच्या उपस्थितीत नियमानुसार पूर्ण झाली.
एकूण ८५ कर्मचार्यांच्या प्रशासकीय व विनंती अर्जावरून बदल्याची प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायत १९, शिक्षण १०, सामान्य प्रशासन विभाग ३५, पशुसंवर्धन ६, वित्त विभाग ४, कृषी विभाग २ बांधकाम विभाग २, मबाक ७ याप्रमाणे कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या आहेत. (Parbhani Zilla Parishad) सामान्य प्रशासनाची उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव व इतर सर्व विभागाचे प्रमुख या बदल्या प्रक्रियेमध्ये हजर होते. बदल्यांमध्ये पारदर्शकता राहिल्यामुळे सर्व कर्मचार्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.




 
			 
		

