पोलीस अधिक्षकांसोबत चर्चेनंतर व्यापार्यांचा बंद मागे
हिंगोली (Hingoli district Traders) : महात्मा गांधी चौकामध्ये दुकानांसमोर गाडे लावले जात असल्याने व्यापारी (District Traders) संतप्त झाले होते. या प्रश्नी उद्या शनिवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघाने घेतला होता. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत ठोस निर्णय घेतल्याने व्यापार्यांनी हा बंद मागे घेतला.
व्यापार्यांनी शनिवारी बाजारपेठ बंदचा दिला होता इशारा
हिंगोली शहराच्या मध्यभागी असलेल्या महात्मा गांधी चौकात दुकानासंमोर हातगाडे लावले जात असल्याने व्यापार्यासोबत वादविवाद व मारहाणीच्या घटना यापुर्वी घडल्या होत्या. याअनुषंगाने प्रशासनाला (District Traders) व्यापार्यांनी अनेक निवेदन देवुन ही त्यावर ठोस उपाययोजना आराखल्या जात नव्हत्या. त्यामुळे माजी आ. गजाननराव घुगे यांच्या उपस्थितीत १३ सप्टेंबरला व्यापारी महासंघाची बैठक घेण्यात येवून १४ सप्टेंबरला हिंगोलीत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही कोणाला त्रास देत नाही, आम्हाला कोणी त्रास देवू नये अशी भुमिका व्यापार्यांनी बैठकीत बोलतांना व्यक्त केली होती.
व्यापार्यांच्या प्रश्नाकडे गांर्भीयाने लक्ष घातले जाईल- श्रीकृष्ण कोकाटे
व्यापार्यांच्या शिष्ट मंडळाची (District Traders) बैठक जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी घेण्यात आली. यावेळी मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेंड अॅॅन्ड कॉर्मसचे उपाध्यक्ष माजी आ. गजानन घुगे यांनी व्यापार्यांना होणार्या त्रासाबद्दल वस्तुुनिष्ठ मुद्दे उपस्थित केले. यावेळी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांंनी व्यापार्यांच्या प्रश्नाकडे गांर्भीयांने लक्ष घातले जाईल अशी ग्वाही दिल्याने व्यापार्यांनी आजचा नियोजित बंद मागे घेतला. परंतु भविष्यात ही व्यापार्यांना त्रास होवु नये अशी मागणी त्यांनी मांडली. बैठकीत व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष पंंकज अग्रवाल, सुभाषचंद्र लदनिया, दिपक निमोदीया, प्रमोद मुंदडा, सचिन गुंंडेवार, सुदर्शन कंदी, लक्ष्मीकांत गुंडेवार, प्रणव दोडल, मुरली हेडा, शाम बजाज, लक्ष्मीकांत व्यवहारे, दिपक बासटवार आदी व्यापार्यांची उपस्थिती होती.




