गुरूदेवाची प्राथना, आणि भजन करून अभिवादन!
कन्हान (Tukadoji Maharaj) : ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण व्दारे शिवरत्न कार्यालय, विवेकानंद नगर कन्हान येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गुरूदेवाची प्राथना, आणि भजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण (Establishment of Rural Development Services) व्दारे शिवरत्न कार्यालय, स्वामी विवेकानंद नगर कन्हान ता. पारशिवनी जि. नागपुर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गुरूदेवाची प्राथना, आणि राष्ट्रवंदना करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पोतदार गुरूजी, मधुकर नागपुरे, बबनराव रायपुरे, कमलेश पांजरे, दिलीप राई कवार, मोतीराम रहाटे, सचिन साळवी, गणेश खांडेक र, बाला नायर, सुतेश मारबते, राखी परते, कल्पना जाधव, शालीनी येलेकर आदीच्या प्रामुख्याने उपस्थित होते. गुरूदेव भजन मंडळ पिपरी यांनी वं. तुकडोजी महाराज यांच्या भजन गायन करून उपस्थिताना मंत्रमुग्ध करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभि वादन करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्य क्रमाच्या यशस्वितेकरिता कमलसिंह यादव, प्रदीप वानखेडे, देवा चतुर, गोविंद जुनघरे, अशोक मेश्राम, रवि रंग, करंडे गुरूजी, अशोक हिंगणकर, मोहन भोयर, प्रदीप बावणे, दामोधर बोकडे, जीवन ठवक्कर, प्रतिक जाधव, अमर किरपाने, प्रविण गोडे, रूपेश सातपुते, पुरूषोत्तम येणेकर, राजेश गणोरकर, हबीब शेख, मनोज गुडधे, निशांत जाधव, तेजस रोडेकर, राकेश चौधरी आदीनी सहकार्य केले.