देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Tumsar: कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ५८ उमेदवार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > भंडारा > Tumsar: कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ५८ उमेदवार
भंडारामहाराष्ट्रराजकारण

Tumsar: कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ५८ उमेदवार

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/02 at 5:39 PM
By Deshonnati Digital Published May 2, 2024
Share
high courts)

७२ उमेदवारानी घेतला उमेदवारी अर्ज मागे

तुमसर(Tumsar):- विदर्भात प्रसिद्ध असलेल्या तुमसर- मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) निवडणुका मागील अडीच वर्षापासून रखडल्या होत्या. उच्च न्यायालयाने (high courts) तीन महिन्यात बाजार समितीची निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून आता सदर निवडणूक १२ मे रोजी होत असुन १३ मे रोजी मतमोजणी होणार असून तुमसर व मोहाडी तालुक्यात पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे .यात तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ७२ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याने आता सदर निवडणुकीत एकुन ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत.सदर निवडणुकीत तुमसर-मोहाडी तालुक्यात एकुन सात मतदान केंद्र असणार आहेत.त्यात तुमसर तालुक्यात तुमसर, सिहोरा,नाकाडोंगरी, मिटेवानी, हे चार मतदान केंद्र तर मोहाडी तालुक्यात मोहाडी, आंधळगाव, करडी असे तीन मतदान केंद्र (polling station) असणार आहेत.तिन्ही पॅनल मध्ये विविध राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने येथे आता वेगळे राजकीय समीकरण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सारांश
७२ उमेदवारानी घेतला उमेदवारी अर्ज मागेशेतकरी, जयकिसान, बळीराजा अशा तिन पॅनल उभ्या ठाकल्यातिन्ही पॅनल मध्ये विविध राजकीय पक्षांची मांदियाळीनिवडणुकीत तिन पॅनल उभ्या ठाकल्या!बाजार समिती ताब्यात घेण्याकरिता राजकीय नेत्याची रस्सीखेच१७ संचालक पदासाठी होणार निवडणूक.!मतदारांची संख्या

बाजार समीतीच्या निवडणुकीत शेतकरी , जयकिसान,बळीराजा अशा तिन वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पॅनल स्थापीत झाल्या आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सेवा सहकारी संस्था गटात
३४ उमेदवार उभे आहेत.
सर्वसाधारण २४
महीला राखीव ०६
ईतर मागासवर्गीय ०४

शेतकरी, जयकिसान, बळीराजा अशा तिन पॅनल उभ्या ठाकल्या

ग्रामपंचायत सर्वसाधारण गटात ०८, अनुसूचित जाती -जमाती ०५, आर्थिक दुर्बल घटक ०४,अडते व्यापारी ०५,हमाल-मापारी ०२, असे एकुन सदर निवडणुकीत ५८ उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत.तर ७२ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सदर बाजार समिती निवडणुकीत विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, महाविकास आघाडीत, महायुतीत , विकास फाउंडेशन आमने-सामने येणार आहे. यात आमदार राजु कारेमोरे व माजी आमदार चरण वाघमारे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (nationalist congress party) शरदचंद्र पवार (Sharad Chandra Pawar) गटाचे जिल्हा अध्यक्ष कीरण अतकरी, रायदयाल पारधी, व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊराव तुमसरे येथे यांचा राजकीय कस लागणार आहे. ३ मे रोजी निवडणुकीत उभे ठाकलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात निवडणुकीच्या प्रचाराला वेग येणार आहे.

तिन्ही पॅनल मध्ये विविध राजकीय पक्षांची मांदियाळी

तुमसर – मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक हे तब्बल अडीच वर्षानंतर होत आहे. सहा महिन्यानंतर विधानसभेची(Assembly) निवडणूक असून दोन्ही तालुक्याच्या राजकारणावर बाजार समितीचे राजकारण अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. बाजार समितीची निवडणूक ही थेट शेतकऱ्यांशी संबंधित असल्याने तसेच दोन्ही तालुक्यातील विशेषता ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते या निवडणुकीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सहभाग घेतात. त्यामुळे या बाजार समितीच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

निवडणुकीत तिन पॅनल उभ्या ठाकल्या!

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका ह्या राजकीय पक्षाच्या चिन्हावर होत नाही. सहकार क्षेत्रातील ही मोठी निवडणूक मानली जाते. विशेषत: तुमसर व मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती ही भंडारा (Bhandara) जिल्ह्यासह विदर्भात सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीत दिग्गज राजकीय नेते निवडणूक लढवितात. या बाजार समितीच्या निवडणुकीला महत्त्व आले आहे. बाजार समिती निवडणुकीत बळीराजा , जयकिसान, शेतकरी, अशा तिन पॅनल उभ्या ठाकल्या आहेत. बाजार समिती निवडणुकीकरिता एकूण १४२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात १३० वैध तर.१२ अवैध ठरले होते. त्यात ७२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे. तरआता एकुण ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत.

बाजार समिती ताब्यात घेण्याकरिता राजकीय नेत्याची रस्सीखेच

येथील बाजार समिती करिता एकूण १८ संचालक पदाकरिता निवडणूक होत आहे. ही बाजार समिती ताब्यात घेण्याकरिता महाविकास आघाडी, महायुती, तसेच अन्य आघाडी येथे प्रयत्नशील राहणार महाविकास आघाडी व महायुती, विकास फाउंडेशन,असे तिन पॅनल उभ्या ठाकल्या आहेत.त्यातच आता स्वतंत्र उमेदवार सुध्दा उभे आहेत.  तिन पॅनल उभ्या ठाकल्या असल्या तरी एका पॅनल चे नेतृत्व आमदार राजू कारेमोरे ,दुसऱ्या पॅनल चे नेतृत्व माजी आमदार चरण वाघमारे,व तिसऱ्या पॅनलचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊराव तुमसरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष कीरण अतकरी,व माजी स़ंचालक रामदयाल पारधी हे नेतृत्व करीत आहेत.

१७ संचालक पदासाठी होणार निवडणूक.!

तुमसर -मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती करिता एकूण १८ संचालक निवडून द्यावे लागतात यात सेवा सहकारी गट ११ ग्रामपंचायत गट ४, अडते व्यापारी गट २ व हमाल मापारी गट १ असे १८ संचालक आहेत.यात आता सेवा सहकारी संस्था गटातील ११ पैकी,भटक्या विमुक्त जाती -जमाती गटातुन गणेशराव बावणे हे एक उमेदवार अविरोध निवडुण आल्याने येथे आता सेवा सहकारी संस्था गटात दहा जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आता १७ संचालक पदासाठी थेट निवडणुक पार पडणार आहे.

मतदारांची संख्या

सेवा सहकारी गटात तुमसर तालुक्यात ७६२ तर मोहाडी तालुक्यात ५४४ असे एकुन १३०६, असे एकुन मतदार संख्या आहे. तुमसर -मोहाडी तालुक्यात एकुण १०५ सेवा सहकारी संस्था आहेत. ग्रामपंचायत गटात तुमसर तालुक्यात ९७ ग्रामपंचायती असून मतदारांची संख्या ८९७ तर मोहाडी तालुक्यात ७५ ग्रामपंचायती असून त्यात ६७६ मतदार आहेत. यात तुमसर-मोहाडी तालुक्यात १७२ ग्रामपंचायती आहेत. अडते व्यापारी गटात ५०२ तर हमाल मापारी गटात २०१ इतकी मतदारांची संख्या आहे.

You Might Also Like

Naxalite Surrender Case: १२ नक्षली जोडप्यांनी शस्त्रे ठेऊन स्वीकारला नवजीवनाचा मार्ग

MLA Suresh Deshmukh: आम्ही पक्षात राहायचे की नाही दिवाळीनंतर ठरवणार: माजी आमदार सुरेश देशमुख

Nagar Parishad Voter List: सहा नगर परिषदांच्या मतदार यादीवर तब्बल २ हजार २ आक्षेपांची नोंद

Pik Vima Company: ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘विमा कंपनी’चा ‘महाप्रताप!

Kharashi Leopard: खराशी येथे बिबट्याला जेरबंद करण्याकरिता लावला पिंजरा!

TAGGED: Agricultural Produce Market Committee, Assembly, bhandara, High Courts, Nationalist Congress Party, Polling station, Sharad Chandra Pawar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भवर्धा

Wardha : वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्प; प्रथमच गावाच्या माहितीचे संकलन

Deshonnati Digital Deshonnati Digital July 25, 2025
Hingoli Hospital: शासकीय रुग्णालयातील डायेलिसिस विभागात आतापर्यंत 19 हजार रुग्णांवर उपचार
Delhi Murder: प्रियकराने, प्रेयसी व 6 महिन्याच्या निष्पाप बाळाचा कापला गळा!
Parbhani House fire: घराला आग; संसारोपयोगी वस्तू जळून खाक…!
Dengue youth Death: डेंग्युचा धोका वाढला; डेंग्युने घेतला 23 वर्षीय युवकांचा जीव
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Naxalite Surrender Case
विदर्भगडचिरोलीमहाराष्ट्रराजकारण

Naxalite Surrender Case: १२ नक्षली जोडप्यांनी शस्त्रे ठेऊन स्वीकारला नवजीवनाचा मार्ग

October 19, 2025
MLA Suresh Deshmukh
विदर्भराजकारणवर्धा

MLA Suresh Deshmukh: आम्ही पक्षात राहायचे की नाही दिवाळीनंतर ठरवणार: माजी आमदार सुरेश देशमुख

October 19, 2025
Nagar Parishad Voter List
विदर्भराजकारणवर्धा

Nagar Parishad Voter List: सहा नगर परिषदांच्या मतदार यादीवर तब्बल २ हजार २ आक्षेपांची नोंद

October 19, 2025
Pik Vima Company
विदर्भभंडाराशेती

Pik Vima Company: ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘विमा कंपनी’चा ‘महाप्रताप!

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?