तुमसर (Tumsar Bar violence) : तालुक्यातील मिटेवानी येथील आस्था बारमध्ये रविवारी रात्री उशिरा हिंसाचाराची घटना घडली. किरकोळ वादातून सुरू झालेल्या हाणामारीत वाहतूक पोलीस नायक राकेश पटले आणि त्याचा मित्र दुर्गेश सांडेकर गंभीर जखमी झाले. पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून, घटनेच्या चौकशीत पोलीस दलाच्या शिस्तीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
घटनेची माहिती अशी : रात्री सुमारे १० वाजेपासून ते ११ वाजता पर्यंत या काळात पोलीस नायक राकेश पटले आणि त्याचा मित्र दुर्गेश सांडेकर आस्था बारमध्ये मद्यपानासाठी गेले होते. (Tumsar Bar violence) काउंटरवर बिल देतांना आरोपी दिनेश राठोड यांचे मोबाईल खाली पडले. राकेश पटले यांनी मोबाईल उचलून दिल्यावर ‘मोबाईल का उचललास?’ असा वाद सुरू झाला.
वाद वाढल्यावर आरोपी राठोडने काचेचा ग्लास तोडून पटले यांच्या डोक्यावर, हनुवटीवर आणि डोळ्याखाली जोरदार मारहाण केली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या तांडेकरलाही मारहाण झाली. त्यानंतर आरोपी दिप शामकुवर, हितेंद्र रामकिशोर जांभुळपाने आणि निकलेश सुरेश पिपरेवार यांनी दोघांवर हाताबुक्यांनी हल्ला केला आणि शिवीगाळ करत पळून गेले.
दोन्ही जखमींना तातडीने तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले, तर सांडेकरची प्रकृती गंभीर असल्याने त्याला भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. (Tumsar Bar violence) घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. सहा. पोलिस निरीक्षक विलास मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत. या प्रकरणी सोमवारी चारही आरोपी न्यायालयात हजर केले गेले. दिनेश राठोड याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर उर्वरित तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली. तपासातून प्रत्यक्ष परिस्थिती लवकरच स्पष्ट होईल.
कायद्याचे रक्षकच कायदा मोडतांना ?
या (Tumsar Bar violence) घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सामान्य नागरिक मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालतात. तेव्हा त्यांच्यावर कारवाई करणारे पोलीसच बारमध्ये मद्यपान करतांना जखमी झाल्याने पोलीस दलाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘कायद्याचे पालन करणारेच जर असे प्रकार करत असतील तर जनतेने आदर्श कुणाकडून घ्यायचा?’ असा सवाल नागरिकांनी केला. दरम्यान, वरिष्ठ अधिकारी मौन बाळगत असल्याने व त्यांचा कर्मचार्यावर वचक नसल्याने असे प्रकार घडत असल्याचे नागरिकांत चर्चा सुरु आहे.