सोन्याच्या दोन अंगठ्या पळविल्या
गंगाखेड शहरात बस स्थानक परिसरात दिवसाढवळ्या घडली घटना…!
परभणी/गंगाखेड (Parbhani Crime) : दोन भामट्यांनी वृद्धाची फसवणूक करून हात चलाखीने वृद्धा जवळील सोन्याच्या दोन अंगठ्या पळविल्याची घटना शुक्रवार ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गंगाखेड बस स्थानक परिसरात घडली आहे. याप्रकरणी (Parbhani Crime) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की शहरातील ओम नगर परिसरातील रहिवासी उमाकांत महारुद्र आप्पा जमशेटे वय ६५ वर्ष हे परळी येथे जाण्यासाठी शुक्रवार ४ एप्रिल रोजी परळी येथे जाण्यासाठी गंगाखेड बस स्थानकावर आले असता दुपारी अंदाजे ११:२० वाजेच्या सुमारास त्यांच्या जवळ आलेल्या अंदाजे ३० ते ३५ वर्ष वयोगटातील दोन इसमांनी धुळे येथे जाण्यासाठी गाडी आहे का असे विचारले तेंव्हा येथून गाडी नाही संभाजीनगर येथून गाडी आहे, असे सांगितले असता दोन अनोळखी इसमांपैकी एकाने जमिनीवरील खडा उचलून घेतला व त्याच्या हातातील खड्याचे रुद्राक्ष झाल्याचे दाखवत रुद्राक्ष हातात देऊन मंत्र म्हणायला लावत त्यांच्या मागे यायला सांगितले व (Parbhani Crime) बस स्थानक परिसरातील पार्किंग जवळील झाडा जवळ गेल्यानंतर दोघांपैकी एका इसमाने हातातील रुद्राक्ष घेत तुमच्या जवळील मौल्यवान वस्तू व हा रुद्राक्ष एका नोटेमध्ये पुडी बांधून रुमालामध्ये ठेवा.
उमाकांत महारुद्र आप्पा जमशेटे यांनी त्यांच्या जवळील पाच ग्राम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (अंदाजे किंमत ५७२७५ रुपये) पन्नास रुपयाच्या नोटेत बांधून रुमालात ठेवल्या त्यापैकी एकाने हा रुमाल उमाकांत जमशेटे यांच्या खिशात ठेवला व तुम्ही हात जोडून जा व घरी गेल्यावर रुमाल उघडून पहा तुम्हाला चांगला लाभ होईल असे सांगितल्याने थोड्या वेळाने रुमाल उघडून पाहिला असता सोन्याच्या दोन्ही अंगठ्या दिसल्या नसल्याने दोन अनोळखी इसमांनी सोन्याच्या दोन अंगठ्या हात चलाखीने काढून घेत फसवणूक केल्याची फिर्याद उमाकांत महारुद्र आप्पा जमशेटे यांनी (Parbhani Crime) गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरून शनिवार ५ एप्रिल रोजी दोन अनोळखी भामट्यांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाखेड पोलीस पुढील तपास करत असुन बस स्थानक परिसरातून भरदिवसा हात चलाखीने फसवणूक करीत दोन भामट्यांनी दहा ग्राम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या पळविल्याने प्रवासी वर्गासह नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.




 
			 
		

