निमित्त झाले झाडाखाली थांबल्याचे आणि घटना घडली
हिंगणघाट (Lightning Death) : पावसादरम्यान वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. या (Lightning Death) घटनेत एक जण जखमी झाला. ही घटना धोत्रा परिसरात शुक्रवार 26 सप्टेंबर रोजी साडेपाच वाजता घडली.
प्राप्त माहितीनुसार, वायगाव (निपाणी) जवळ असलेल्या भिवापूर येथील अनिल दत्तूजी ठाकरे (वय 41), सौरभ गजानन ठाकरे (वय 25), मुलगा वेदांत अनिल ठाकरे (वय 18) हे तीन जण नातेवाईक मोटरसायकलने चारमंडळ येथे आत्याकडे कार्यक्रमासाठी जात होते. मोटरसायकलने धोत्रा मार्गे चारमंडळला जात असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यावेळी त्यांनी मोटर सायकल थांबवली आणि झाडाखाली रेनकोट घालत होते. दरम्यान, अचानक (Lightning Death) विजेचा कडकडाट होऊन वीज कोसळली.
या (Lightning Death) दुर्दैवी घटनेमध्ये अनिल दत्तूजी ठाकरे, सौरभ गजानन ठाकरे हे दोघेही जागेवर ठार झाले. मुलगा वेदांत अनिल ठाकरे हा जखमी झाला. दोन्ही मृतकाचे मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले. वेदांत अनिल ठाकरे हा जखमी अवस्थेत भरती आहे. शुक्रवारी मुसळधार पावसासोबत मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट होता. या (Lightning Death) दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.