उमरखेड (Tractor Accident) : औरंगाबाद माहूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरी (चा) येथे २१ जून रोजी दुपारी १ वाजताचे सुमारास हिमायतनगर कडून येणार्या दुचाकी वाहनाने उभ्या ट्रॉलीला जोरदार धडक दिल्याने अनोळखी एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीररीत्या जखमी झाला आहे.
हिमायतनगर कडुन ब्राम्हणगाव कडे डब्बलसीट येत असलेल्या दुबाकी क्र. टीएस १६ एफ., सी. ९१३५ या दुचाकीने बोरी (ना) येथील बस थांब्या जवळील रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रैक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये (Tractor Accident) अनोळखी एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीररित्या जखमी झाला. तेथे जवळपास असलेल्या लोकांनी तत्काळ १०८ कमांकावर रुग्णवाहिकेला व उमरखेड पोलीस स्टेशनला फोन केला मात्र रुग्णवाहिका लवकर उपलब्ध होणार नसल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर काही जणांनी गंभीर जखमी असलेल्या एकास उपचारासाठी हिमायतनगर येथे नेल्याचे माहिती मिळाली अनोळखी अपघातप्रस्त हे बारड ता. भोकर येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. उमरखेड पोलीसांनी (Tractor Accident) घटनास्थळ पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह उमरखेडच्या शासकिय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे वृत्त लिहीपर्यंत मूत्तकाची ओळख पटली नाही.