गडचिरोली जवळील सावेला- मारोडा मार्गावरील घटना
गडचिरोली (Gadchiroli Horrific Accident) : एका चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन युवकांचा मृत्यू झाला. सदर अपघाताची घटना आज ९ जुन रोजी सायंकाळच्या सुमारास गडचिरोली शहरापासून जवळ असलेल्या सावेला- मारोडा मार्गावर घडली. दिवाकर विठ्ठल उसेंडी (३२) रा. फुलबोडी (ता. धानोरा) व अनुराग इरईजी मडावी (२८) रा.कसनसूर (ता. एटापल्ली) असे अपघातात ठार झालेल्या युवकाची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार आज सोमवारी सदर दोन्ही युवक एम.एच.३३/ एएच/ ३०५० क्रमांकाच्या दुचाकीने गडचिरोली येथून पोटेगाव येथे जात होते. विरूध्द दिशेने येणार्या एम.एच/३३/टी/ ३६९३ क्रमांकाच्या चारचाकी मालू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या (Gadchiroli Horrific Accident) अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
अपघात एवढा भिषण होता की दुचाकीच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला आणि दुचाकी वाहन मृतकांच्या अंगावर पडले होते. (Gadchiroli Horrific Accident) अपघाताची घटना घडताच सावेला- मारोडा येथील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलीस पाटील सिमा मेश्राम यांनी दोन्ही युवकांना उपचारासाठी रूग्णवाहीका बोलावली. परंतू तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.
या (Gadchiroli Horrific Accident) घटनेची माहिती मिळताच पोटेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पाटिल सिमा मेश्राम सामाजिक कार्यकर्ता ज्ञानेश्वर मुजुमकर व सुरेश उसेंडी यांनी सहकार्य केले. मृत्युदेह शवच्छेदेनासाठी गडचिरोली येथील रूग्णालयात नेण्यात आले. अधिक तपास पोटेगाव पोलीस करीत आहेत.
