दोघे बचावले; काल पासून शोध मोहीम सुरू
उदगीर (Udgir Death) : जळकोट तालुक्यातील माळहिपरगा ते पाटोदा खुर्द या रोडवर असलेल्या पुलावरून ॲटोसह तिघेजण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना दिनांक 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:30वाजता च्या सुमारास घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की , जळकोट तालुक्यातील माळहिपरगा येथील चार ते पाच जण ॲटो मध्ये बसून पाटोदा खुर्द कडे जात होते. या दरम्यान पुलावरून अगोदरच पाणी वाहत होते, परंतु कमी होते. (Udgir Death) पुलाच्या मधोमध ॲटो गेल्याबरोबर बंद पडला. या नदीचा उगम होतो त्या नदीच्या परीसरात मुसळधार पाऊस झाल्यामूळे अचानक पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ऑटोरिक्षा मधील शान मुरहरी सुर्यवंशी, वैभव गायकवाड, राहणार माळहिपरगा हे व पाटोदा बुद्रुक येथील विठ्ठल गवळे हे पुराच्या पाण्यात वाहून गेले. तर ऑटो मधील चालक संग्राम सोनकांबळे हा व दुसरा एक पाटोदा बुद्रुक येथील बंटी वाघमारे हा देखील बचावला आहे.
शान मुरहरी सूर्यवंशी हा ड्युटीवर जाण्यासाठी जळकोटकडे निघाला होता. शान सूर्यवंशी हा सीआयएसएफ मध्ये नागपूर येथे नोकरीला होता. तो काही दिवसापूर्वी गावाला आला होता. रजा संपल्यामुळे ड्युटी साठी नागपूरकडे जाण्यासाठी गावाकडून उदगीरकडे चालला होता. मात्र जात असतानाच पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला आहे. त्याच्यासोबत वैभव गायकवाड हा सोडण्यासाठी जात होता. तो देखील पाण्यात वाहून गेला. (Udgir Death) घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासनाचे कर्मचारी व पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
काल पासून शोध मोहिम सुरु पण शोध अद्यापही लागला नाही
या पुरात जे तीन व्यक्ती वाहुन गेले आहेत त्यांचा शोध घेतला जात. (Udgir Death) यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे आपात्तकालीन परस्थीतील कर्मचारी दाखल झाले असून शोध घेत आहेत. दुपारपर्यंत यांचा शोध लागला नव्हता.
तालुक्यात दोन घटनेत चार जन वाहुन
जळकोट तालुक्यातील विविध दोन घटनेत चार जन वाहून गेले आहेत. तिरूका येथील एक युवक तेरू नदीत मासे पकडताना पडून वाहून गेला व माळहिप्परगा ते पाटोदा खुर्द या पुलावरुन ॲटो सह तीन जन वाहुन गेले आहेत. घटनास्थळी प्रशासन तळ ठोकून आहेत. जळकोट तालुक्याचे तहसिलदार राजेश लांडगे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तलाठी आकाश पवार, पोलीस निरिक्षक सचीन चव्हाण, सरपंच सुनीता चव्हाण आदी अधिकारी घटनास्थळी परस्थीतीवर लक्ष ठेवून आहेत.