14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी
हिंगोली (Unaided Schools) : राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक यांच्यावतीने दिनांक 5 जून पासून आझाद मैदानावर हुंकार आंदोलन पुकारले आहे. राज्यातील अंशतः अनुदानित शाळा महाविद्यालय (Unaided Schools) यांना टप्पा वाढ अनुदान देणे बाबत राज्य शासनाने 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून दिनांक 1जून 2024 पासून वाढीव 20 टक्के टप्पा अनुदान देण्याचे निर्णय घेतला आहे परंतु आज नऊ महिने होऊन सुद्धा या शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसून त्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही.
याचाच रोष ठेवून शिक्षक समन्वय संघ यांच्या वतीने 5 जून पासून आझाद मैदानावर हुंकार आंदोलन पुकारले आहे. पावसाळी अधिवेशनात टप्पा वाढ बाबत कुठल्याही प्रकारची निधीची तरतूद झालेली नसून शासनाने पुन्हा शिक्षकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय (Unaided Schools) यातील शिक्षकांनी दिनांक आठ व नऊ शिक्षक बांधवांचा असंतोष सरकारच्या विरोधात वाढला असून 8 व 9 जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शाळा महाविद्यालय बंद ठेवून आझाद मैदान मुंबई येथे जाण्याचा निर्धार शिक्षक बांधव भगिनी यांनी केला आहे.
यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विनाअनुदानित तथा अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक बांधव यांनी शाळा बंद बाबतचे निवेदन हिंगोली जिल्हाधिकारी तथा हिंगोली शिक्षणाधिकारी यांना दिले आहे. यावेळी जिल्ह्यातील पाच ही तालुक्यातील शिक्षक बांधव, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राज्य शासनाने याच पावसाळी अधिवेशनात टप्पा वाढ निधीची तरतूद करून शिक्षक वर्गाला न्याय द्यावा. अन्यथा येणाऱ्या दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक बांधव हा रस्त्यावर उतरून राज्य शासनाचा निषेध नोंदवून संपूर्ण शाळा महाविद्यालय (Unaided Schools) हे कडकडीत बंद ठेवणार आहेत. याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य शासनावर असणार आहे असा इशारा शिक्षक समन्वय संघ जिल्हा हिंगोली यांनी राज्य सरकारला देण्यात आला आहे.