अर्जुनी मोरगाव/गोंदिया (Rajoli forest Body): तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या राजुरी जंगलातमृत वेडसर महिलेचा मृत्यू देह आढळून आला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजोली हद्दीतील एफ डी सी एम जंगल परिसरात पाथर गोटा नजीकच्या उजव्या बाजूला एका (अंदाजे ४०) वर्षीअनोळखी (Rajoli forest Body) महिलेचे प्रेत आज ता. १० रोजी आढळले असल्याची घटना उघडकीस आली. मृत महिलेचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मृत वेडसर महिला जंगल परिसरात फिरत होती.
महिलेचा मृत्यू भुकेने व्याकूळ झाल्याने की अत्याचार करून केलेली हत्या तर नाही ना ! अशी शंका व्यक्त केली जात असून घटनेचा उलगडा करण्याचे आव्हान केशोरी पोलिसांपुढे निर्माण झाले आहे. अशा अवस्थेत मृत महिलेचा मृतदेह तिच्या सोबत असलेल्या गाठोड्यासह संशयास्पद पद्धतीने आढळून आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला (Rajoli forest Body) ही बऱ्याच दिवसापासून वेडसर असल्याने जंगल परिसरात भटकत होती. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सदर महिलेचा मृत्यू भूक आणि तहानेने झाला असल्याची माहिती आहे. घटना स्थळी केशोरी पोलीस स्टेशनचे भोसले, पो. ना. मेश्राम, पो. ना भांडारकर,, पो शी मारबते मपोशी मारबते आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यासह वनकर्मचारी उपस्थित होते.
प्राप्त माहितीनुसार वनविकास महामंडळ (एफ डी सी एम) कक्ष क्रमांक ३३७ येथील जंगल परिसरात लाकडी बिट तोडाई व ट्रॅक्टर आणि ट्रक मध्ये भरून वाहतूक करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान कापलेले विट लाकडे ट्रॅक्टर ट्रॉलीत भरण्यासाठी मजूर गेल्याने त्यांना त्या (Rajoli forest Body) मृत महिलेचे प्रेत आढलून आले. या घटनेची माहिती मजुरांकरवी सबंधित वनकर्मचारी यांना देण्यात आली. वन कर्मचाऱ्यांनी क्षणाचा विलंब न करता घटनेची माहिती केशोरी पोलिसांना दिली. काही वेळात घटना स्थळी पोलीस आणि शव विच्छेदन अधिकारी दाखल झाले व मृत महिलेचा पंचनामा आणि शवविच्छेदन करून घटना स्थळाच्या बाजूला मृत महिलेचे शरीर दफन करण्यात आले.