ब्राह्मण सभा हिंगोली सामुहिक उपनयन संस्कार सोहळा समितीचा उपक्रम!
हिंगोली (Upanayan Sanskar Sohala) : नांदेड बायपास वरील विशाल मंगल कार्यालयात 29 मे रोजी सकाळी 10.15 वाजता सामुहिक व्रतबंध सोहळा (Group Vow Ceremony) आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक नागरिकांच्या (Citizens) उपस्थितीत सहा बटुंचा उपनयन संस्कार सोहळा पार पडला. ब्राह्मण सभा हिंगोली (Brahmin Sabha Hingoli) सामुहिक उपनयन संस्कार शिबीर सोहळा समितीच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी सामुहिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन 29 मे रोजी करण्यात आले होते.
बटूंची रथामध्ये बँड ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक!
यावेळी औंढा नागनाथ येथील आदित्य प्रसाद पांडे, हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील श्रीराज गजानन जोशी परळकर, कळमनुरी येथील समर्थ महेश कळमनुरीकर, हिंगोलीतील समर्थ प्रवीण सराफ, हिंगोलीतील शर्विल समित देशमुख फाळेगावकर तर हिंगोली तालुक्यातील हिंगणी येथील अभिषेक अतुल पांडे हिंगणीकर या सहा बटुंवर उपनयन संस्कार सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला. यावेळी अनेक महिला पुरुष युवक युवती मोठ्या संख्येने सोहळ्याला उपस्थित होते. दरम्यान उपनयन संस्कार सोहळ्यापूर्वी अष्टवर्ग भोजन, मातृ भोजन, हवन असे अनेक विधिवत कार्यक्रम घेण्यात आले. तसेच बटूंची रथामध्ये बँड ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.बटूंसह माता-पित्यांना समितीच्या वतीने आहेर करण्यात आला. या सोहळ्यासाठी ब्राह्मण सभा हिंगोली सामुहिक उपनयन संस्कार शिबीर सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी (Committee Officers) अथक परिश्रम घेतले.




