नवी दिल्ली (Vaibhav Suryavanshi) : वैभव सूर्यवंशी अल्पावधीतच मोठा विक्रम केला आहे. (IPL) आयपीएलमध्ये त्याचे स्फोटक शतक हे फक्त एकच क्षण नव्हता. त्याने इंग्लंडमध्येही तोच वेग दाखवला आहे आणि गोलंदाजांचा धुव्वा उडवून, काही विक्रमही प्रस्थापित केले आहेत. भारताचा 19 वर्षांखालील संघ आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी गेला होता आणि तेथे मालिका जिंकण्यात यशस्वी झाला आहे. या मालिकेच्या विजयात (Vaibhav Suryavanshi) वैभव सूर्यवंशीने महत्त्वाची आणि मोठी भूमिका बजावली, त्याच्या झंझावाती फलंदाजीने संघाला मदत केली.
दरम्यान, सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) एक असा विक्रम आपल्या नावावर केला आहे, जो आतापर्यंत इतर कोणताही खेळाडू करू शकला नाही. सूर्यवंशी या बाबतीत जगातील पहिला खेळाडू बनला आहे. त्याने युवा एकदिवसीय मालिकेत सर्वोत्तम स्ट्राइक रेटचा विक्रम नोंदवला आहे. वैभव या यादीत अव्वल स्थानावर आहे.
वैभव सूर्यवंशीचा धमाका
वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) 5 सामन्यांमध्ये स्फोटक फलंदाजी करून एकूण 355 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतकही आहे. त्याचा स्ट्राईक रेट 174 आहे, जो जगात सर्वाधिक आहे. येथे किमान 200 धावा करणाऱ्या फलंदाजांचा उल्लेख केला आहे. (Vaibhav Suryavanshi) सूर्यवंशीपूर्वी स्ट्राईक रेट आयर्लंडच्या स्कॉट मॅकबार्थचा होता. त्याने दोन सामन्यांमध्ये 91 धावा केल्या आणि त्याचा स्ट्राईक रेट 150 होता. 100 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या कोणत्याही खेळाडूपेक्षा (Vaibhav Suryavanshi) वैभव सूर्यवंशीचा स्ट्राईक रेट जास्त आहे. त्याने सर्वांना मागे टाकले.
वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानला हरवले..
पाकिस्तानकडून खेळणाऱ्या इम्रान नझीरने 1999 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांमध्ये 256 धावा केल्या. त्या काळात नझीरचा स्ट्राईक रेट 159 पेक्षा जास्त होता. मात्र, आता सूर्यवंशीने नझीरला खूप मागे टाकले आहे आणि अव्वल स्थानावर आपले नाव नोंदवले आहे. या मालिकेत, (Vaibhav Suryavanshi) वैभव सूर्यवंशीने युवा एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रमही केला. त्याने हा विक्रम फक्त 52 चेंडूत केला. युवा एकदिवसीय सामन्यात यापेक्षा जलद शतक दुसऱ्या कोणत्याही खेळाडूने केलेले नाही. त्याने 78 चेंडूत 143 धावा केल्या.”