पुसद (Vasantrao Naik) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक (Vasantrao Naik) पुरस्कार सोहळा दरवर्षी दि. 18 ऑगस्ट रोजी वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात येत असतो. या दिवशी मान्यवरांच्या हस्ते राज्यातील कर्तबगार व प्रगतिशील शेतकऱ्यांचा सपत्नीक शाल श्रीफळ देऊन सत्कार व गौरव करण्यात येत असतो. मात्र यंदा हा सोहळा पुढे ढकलल्याचे एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे उपाध्यक्ष धनंजय सोनी वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद यांच्या तर्फे कळविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे वसंतराव नाईक (Vasantrao Naik) स्मृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष दीपक आसेगावकर व सचिव प्रा. उत्तम रुद्रवार यांनी प्रकृतीच्या कारणावरून राजीनामे दिलेत तर स्मृती प्रतिष्ठानच्या संचालक विजय जाधव, अनिरुद्ध पाटील चोंडीकर व सिराज हिरानी यांनी सुद्धा राजीनामे दिलेत हे येथे उल्लेखनीय.




