पांढरकवडा (Yawatmal) :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) सभापतीपदी शिवसेनेचे विनोद जनार्धनराव डंभारे यांची तर उपसभापतीपदी कॉग्रेसचे संजय नाईनवार यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रीक निवडणुकीमध्ये शिवसेनेचे पालकमंत्री संजय राठोड, कॉग्रेसचे माजी मंत्र शिवाजीराव मोघे, सामाजीक कार्यकर्ते सलीम खेतानी यांच्या नेतृत्वात १८ पैकी १७ संचालक निवडुण आले होते.
सामाजीक कार्यकर्ते सलीम खेतानी यांच्या नेतृत्वात १८ पैकी १७ संचालक निवडुण आले
या निवडणुकीमध्ये भाजप (BJP)व कॉगे्रसच्या बंडखोर गटास एकही जागा जिंकता आली नाही. नवनिर्वाचीत संचालकातुन सभापती, उपसभापतीची निवड करण्याकरीता आज २० रोजी प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निंबधक पांढरकवडा यांनी संचालकांची विशेष सभा आयोजीत करुन सभापती,उपसभापती पदाकरीता निवडणुक कार्यक्रम घोषीत केला होता. सभापती, उपसभापती पदाकरीता नामांकन अर्ज भरण्याच्या अंतीम वेळे पर्यत सभापती पदाकरीता शिवसेनेचे विनोद डंभारे व उपसभापती पदाकरीता कॉग्रेसचे संजय नाईनवार यांचा प्रत्येकी एक,एकच अर्ज आल्याने प्राधिकृत अधिकार्यांनी दोन्ही पदाधिकार्यांची अविरोध निवड झाल्याचे घोषीत केले. सभापती, उपसभापती निवड अविरोध झाल्यानंतर शिवसेना(Shivsena) व कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या आवारात फटाके फोडुन तथा पेढे वाटप करुन जल्लोश साजरा केला होता.
यावेळी शिवसेना व कॉग्रेसचे बाजार समितीचे नवनिर्वाचीत संचालक उपस्थित होते. तसेच कॉग्रेसचे जितेन्द्र मोघे, शिवसेनेचे तालुका प्रमुख जयवंत बंडेवार, शहर प्रमुख आतिश चव्हाण, विजय पाटील, कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष अमर पाटील, माजी नगरसेवक साजीद शरिफ, राजु खैरा, डॉ अभिनय नहाते, गोपाल बाजोरीया, अनुप पाटील, प्रेम चव्हाण, दिगांबर भोयर, अवि पाटील, विजय तेलंगे आदिसह शिवसेना व कॉग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.