परभणी (Parbhani):- जिंतूर तालुक्यातील इटोली येथे राजाराम खुने यांच्या शेत सर्वे नं. ३९० मध्ये १७ डिसेंबरच्या रात्री हिंस्त्र पशुने हल्ला करत बारा शेळ्यांचा फडशा पाडला. यामध्ये शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती वनविभागाला (Forest Department) देण्यात आल्यानंतर वनविभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
परभणीतील जिंतूर तालुक्यातील इटोली येथील घटना
किशन शेळके व भगवान मोरे यांनी आखाड्यावर शेळ्या बांधल्या होत्या. रात्रीच्या वेळी या शेळ्यावर हिंस्त्र पशुने (Violent animal) हल्ला केला. घटनेची माहिती समजल्यानंतर इटोलीचे सरपंच, वनरक्षक सीमा राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी मृत जनावरांची उत्तरीय तपासणी केली. या घटनेत पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.