औंढा नागनाथ (Agristock Camp) : तालुक्यातील आसोला तर्फे औंढा नागनाथ येथे गावातील शेतकरी नागरिकांचे फार्मर आयडी (Agristock Camp) तयार करण्यासाठी आज दिनांक 19 मार्च बुधवार रोजी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान दुपारी साडेतीन वाजे दरम्यान जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी या कॅम्प ला भेट दिली व शेतकरी ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी (Agristock Camp) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले वसमत उपविभागीय अधिकारी विकास माने तहसीलदार हरीश गाडे, सहाय्यक गटविकास अधिकारी बालाजी गोरे, तालुका कृषी अधिकारी गोविंद काळे, मंडळ अधिकारी पीआर काळे करण पवार, सज्याच्या तलाठी सुवर्णमाला शिरसाट, गावचे सरपंच विष्णू नागरे, विस्तार अधिकारी सय्यद जमील, संचालक माऊली ढोबळे, मंडळ कृषी अधिकारी विजय संघई कृषी सहाय्यक प्रकाश राऊत पाणीपुरवठा अभियंता नरवाडे, उपसरपंच द्रुपदा आव्हाड संजय नागरे, बबनराव ढोबळे ग्रामसेवक गंगाप्रसाद गायकवाड मुरलीधर नागरे अंगद ढोबळे आकाश घुगे कृष्णा ढोबळे आदींची उपस्थिती होती.
यादरम्यान जिल्हाधिकारी यांनी (Agristock Camp) आग्रिस्टॅक फार्मर आयडीबाबत नोंदणी करून घेण्याकरिता ग्रामस्थांना माहिती दिली व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी गावातील पाण्याच्या सोर्स बाबत माहिती घेतली. तसेच शाळा गुणवत्ता अनुषंगाने ही ग्रामस्थांशी चर्चा केली एकही शेतकरी आग्रिरीस्टॅक फार्मर आयडी नोंदणी पासून वंचित राहू नये, अशा सूचना दिल्या. या प्रसंगी असोला तर्फे औंढा नागनाथ गावात एकूण 775 शेतकरी लाभार्थी असून आतापर्यंत 486 फार्मर आयडी काढण्यात आल्याची माहिती तलाठी शिरसाठ यांनी दिली आहे अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते.




 
		
