Gadchiroli :- गोसेखुर्द धरणातून ५.२९ लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी (Vainganga River) धोका पातळीच्यावरून वाहत असल्याने प्रशासनाने नागरीकांना सावधगिरीचा ईशारा दिला आहे.
नदीच्या पाण्याची पातळी २१६.१९ मीटर
गडचिरोली जिल्ह्यात चिचडोह बॅरेजमधून ६.३३ लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.गोदावरी नदीवरील मेडीगट्टा प्रकल्पातून १.२६ लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामध्येही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या विसर्गामुळे साखरा ते देसाईगंज दरम्यान वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी २१६.१९ मीटर झाली आहे. ही नदी धोका पातळीच्या वरून वाहत आहे. आष्टी नजीक वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी १५१.९२ मीटर आहे. अहेरी गुडम पुलावर प्राणहिता नदीच्या पाण्याची पातळी ११६.७० मीटर आहे.कालेश्वरम येथे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी ९७.६८ मीटर आहे.चिंदनार येथे इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी ३३२.८० मीटर असुन ही ईशारा पातळीच्या खाली आहे. तसेच पातागुडम येथे इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी ९२.१२ मीटर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.