धुलियानमध्ये एका व्यक्तीला लागली गोळी!
नवी दिल्ली (Waqf Act) : पश्चिम बंगालमधील (Murshidabad) 11 एप्रिल रोजी झालेल्या, हिंसाचाराच्या प्रकरणात, पोलिसांनी सांगितले की, जिल्ह्यातील दोन भागात काही लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर आमची टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा एका घरात दोन लोक चाकूने गंभीर जखमी अवस्थेत आढळले. ज्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
लुटमार केल्यानंतर, हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने केले वार!
मृतांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, त्यांच्या घरी दरोडा टाकताना दरोडेखोरांनी दोघांवरही अनेक वेळा चाकूने हल्ला केला होता. एका वेगळ्या घटनेत, समसेरगंज ब्लॉकमधील धुलियान (Dhulian) येथे आणखी एका व्यक्तीला गोळी लागल्याचे वृत्त आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वक्फ कायद्याविरुद्धच्या निदर्शनांदरम्यान शुक्रवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सुती आणि समसेरगंज भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार (Violence) झाल्याचे वृत्त आहे.
पोलिसांनी आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना केली अटक!
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ कायद्याच्या (Waqf Act) विरोधात झालेल्या निदर्शनांवरून (Demonstration) दोन दिवस हिंसाचार झाला. प्रथम 8 एप्रिल रोजी आणि नंतर 11 एप्रिल रोजी, ज्यामध्ये आतापर्यंत, पोलिसांनी कारवाई केली आहे आणि 100 हून अधिक लोकांना अटक केली आहे.