देवळी विश्रामगृह ते यशोदा नदीपर्यंत रस्त्याचे नूतनीकरण. पाणी वाहणारा भाग सोडून रस्त्यालगतच बांधकाम
रस्त्यालगतचे नाली बांधकामा मुळे अपघातास निमंत्रण,
वर्धा (Wardha) देवळी शहरातील (Deoli ) राष्ट्रीय महामार्गाचे (National Highway) तीन किलोमीटर नूतनीकरण व सुधारित रस्ते बांधकामास विश्रामगृह ते यशोदा नदीपर्यंत(From rest house to river Yashoda) कामास सुरुवात करण्यात आली. दरम्यान नाली बांधकामही सुरू आहे. मात्र सदोष बांधकामामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. या कामासाठी २५ कोटींचा निधी (25 crore fund for work) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून(Union Ministry of Road Transport and Highways) मंजूर करण्यात आला आहे. रस्त्याचे बांधकाम विश्रामगृहाजवळून यवतमाळकडे (rest house towards Yavatmal) जाणाऱ्या महामार्गाला जोडून देवळी शहरातून यशोदा नदीपर्यंत होणार (Deoli city to Yashoda river) आहे. सदर रस्ता दहा मीटर रुंदीचा व १८ सेंटीमीटर जाडीचा आहे. दोन्ही बाजूंनी नाली बांधकाम आहे. सध्या नालीचे बांधकाम सुरू आहे. नाली रस्त्याजवळ असून अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे प्रत्येक वाहनचालक आपले मत व्यक्त करीत आहे. नाली बांधकाम नेहमी पाणी वाहणाऱ्या खोलगट उतारावर असल्याने खालचे पाणी नालीत कसे येईल. यावर सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. रस्त्यालगत पेव्हिंग ब्लॉक (Paving block) आणि नंतर नालीचे बांधकाम करणे आवश्यक होते. परंतु तसे न करता तीन फूट रुंदीची नाली रस्त्यालगत बांधण्यात येत आहे. ते बांधकाम सदोष होत असल्याची ओरड सुरू आहे. यावर लोकप्रतिनिधी (People’s representatives) मौन बाळगून आहे. या रस्त्यावरील वर्दळ लक्षात घेता रस्ता २० मीटर रूंदीचा पाहिजे होता. सेलू ते घोराड हा रस्ता दुभाजकासह बांधण्यात आला. त्यामुळे सौदर्याकरण, विकासात्मक स्वरूप प्रज्ञपत झाले आहे. याच स्वरूपाचे बांधकाम येथे करायला पाहिजे होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या बांधकामाची चौकशी करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.
या बांधकामाची सखोल चौकशी करा
नालीचे बांधकाम थांबवून खोलगट भागात नाली बांधण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. जेणेकरून भविष्यात रस्ता रुंदीकरण करता येईल. वहोणारे अपघात टाळता येईल. नालीचे बांधकाम खोलगट भागात केले तर नाली व रस्त्यामध्ये मुरूम जास्त टाकावा लागेल व खर्च वाढेल. या अनुषंगाने कंत्राटदार नालीचे बांधकाम करीत आहे. अशी शंका वर्तविली जात आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी सर्वसामान्य करीत आहे.