मानोरा(Washim):- तालुक्यातील लाडक्या बहिणीने पोर्टल व नारी शक्ती ऍप मधून ४३४४१ अर्ज दाखल केले. त्या पैकी ४२५४७ अर्ज मंजूर झाले असून दोन हप्ते खात्यात जमा झाले. तात्पुरते ४४७ अर्ज रद्द झाले असून, ३६३ अर्ज कायम रद्द झाल्याची माहिती महसूल विभागाकडून प्राप्त झाली आहे.
४२५४७ अर्ज मंजूर; ४४७ अर्ज तात्पुरते रद्द
मानोरा तालुक्यातील महिलांनी लाडकी बहीण योजनेत पोर्टल वरून १९६२१ व नारी शक्ती ऍप मधून २३८२० अर्ज केले होते. याची संख्या ४३४४१ अर्ज पैकी पोर्टल वरील १८७९० व नारी शक्ती ऍप वरील २३७५७ असे ४२५४७ अर्ज मंजूर झाले असून या महिलांना शासनाकडून दोन हप्ते बँक खात्यात (Bank Account)जमा झाले आहे. पोर्टल वरील ३८९ व नारी शक्ती ऍप वरील ५८ असे ४४७ अर्ज तात्पुरते रद्द झाले असून तात्पुरते रद्द झालेले अर्ज पोर्टल व नारी शक्ती ऍप वरून पुन्हा पाठविण्याची व्यवस्था आहे. मात्र ज्या लाडक्या बहिणीचे अर्ज कायम रद्द झाले अशा पोर्टल (Portal)वरील ३५८ व नारी शक्ती ऍप वरील ५ एकूण ३६३ लाडक्या बहिणी या योजने पासून मुकणार आहे. कायम रद्द झालेले लाडक्या बहिणीचे अर्ज पुन्हा घेण्यासाठी वरिष्ठ पातळी वरून प्रयत्न होणे गरजेचे आहे.