रिसोड( Risod):- स्थानीक कृषि उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) मध्ये गैरव्यवहार सुरू असून याची सखोल चौकशी व्हावी, या मागणी करिता गुरुवार 2 जानेवारी रोजी सहायक उपनिबंधक कार्यालया समोर सकाळी 11 ते 3 या या दरम्यान धरणे आंदोलन करण्यात आले.
कार्यालया समोर सकाळी 11 ते 3 या या दरम्यान धरणे आंदोलन
या पूर्वी या संदर्भत बाजार समितिचे संचालक संतोष सानप, माजी संचालक घनश्याम मापारी, डॉ.रामेश्वर नरवाडे, विठ्ठललराव आरू यांनी 26 डिसेंबर रोजी सहायक उपनिबंधक यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, विधानसभा निवडणुकीची (assembly elections) आदर्श आचार संहिता सुरू असताना बाजार समिति मध्ये बनावट कागदपत्रे तयार करून आर्थिक देवान घेवान करण्यात आली. गेल्या तीन महिन्यात बनावट देयक अदा करण्यात आली. यासह बऱ्याच दिवस पासून प्रलंबित असलेले परवान्यांचे नूतनीकरण आर्थिक देवान घेवान करून देण्यात आले. अनेक व्यापाऱ्यांकडे शेष थकीत असताना त्याना बाजार समितित शेतमाल खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली .कमी दराने सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना सभापति व संचालक कङून सहकार्य केले जात आहे. या कड़े शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात माजी कृषि सभापती विश्वनाथ सानप, डॉ.चंद्रशेखर देशमुख, माझी सभापती त्याचा संचालक संजय शिंदे,माजी सभापती तथा संचालक राजाराम आरु, सुभाष केदारे, किसनराव कळासरे, विश्वनाथ पठाडे, भगवान गाडे, विकास जाधव, वामन मोरे, अल्ताफ घनकर, डॉ .गजानन सानप, प्रा. भागवत मोरे, अशोक नागरे,आनंद कुलाळ, नारायणराव आरु ,डॉ.रामेश्वर रंजवे, शिवाजी सोनुने,संतोष जाधव, भाऊराव भिसे, गंगाराम सुरशे, गजानन खडसे, संतोष वाघ, विश्वनाथ आरू, प्रकाश चोपडे, मधुकर आडे, सुनील बोडखे, नागेश बुधनेर, डिगांबर जाधव, योगेश शिंदे, संजय इरतकर, कैलास पवार, आसाराम घुगे यांचसह विविध पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.