मानोरा(Washim):- येथील पोलीस स्टेशन (police station)मध्ये पोलीस पाटील संघटना मानोराचे वतीने नुतन वर्षभिदिनी दि. १ जानेवारी रोजी पोलीस पाटील कौटुंबिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे, नायब तहसीलदार संदीप आडे, पि एस आय सरोदे, अल्लापुरकर, बाबाराव पवार, अजमीरे, महाजन, पोलीस पाटील संघटना जिल्हाध्यक्ष शामराव राठोड, तालुकाध्यक्ष गोपाल लाहोटी, उपाध्यक्ष निलेश ठाकरे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोहर राठोड सह मान्यवर उपस्थित होते. यावेळी वसंतनगर येथील सेवानिवृत्त पोलीस पाटील अविनाश राठोड, नायनी गावाचे केशवराव काळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सापत्नीक सन्मान (honor) करण्यात आला.
लोकसभा विधानसभा निवडणूक उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तीपत्राचे वाटप
कार्यक्रमादरम्यान प्रास्ताविक गोपाल लाहोटी, शामराव राठोड ,नायब तहसीलदार संदीप आडे, अल्लापूरकर, सरोदे यांनी मनोगत व्यक्त केले. आयुषी अजाब मनवर, ईशा वासुदेव सोनोने या मुलींनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. लोकसभा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महसूल विभाग व पोलीस विभागामार्फत प्रशस्ती पत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव सोनोने पोलीस पाटील कारखेडा जिल्हा सचिव पोलीस पाटील संघटना वाशिम यांनी केले. भारताचे माजी पंतप्रधान (Former Prime Minister) डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व पोलीस पाटील सहकुटुंब व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.