रात्रभर गस्त असतानाही रेतीवाले बिनधास्त
वसमत मधील अवैध रेती वाहतुक बंद होईना
वसमत (Wasmat police) : शहरात मध्यरात्रीनंतर रेती घेऊन येणारा हायवा वसमत पोलिसांनी पकडला वाळू व हायवा असा नऊ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनेक दिवसानंतर अखेर एक हायवा पोलिसांना सापडला पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.
वसमत शहरात अवैध रेती वाहतूक बंद होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे पोलिसांची रात्रभर गस्त असताना सुद्धा रेती माफिया पोलिसांना घाबरत नाहीत बिनधास्त हायवा घेऊन येत असतात त्यापैकी एक हायवा बुधवारी रात्री पोलिसांनी पकडला आसेगाव रोड बुधवारी रात्री नांदेड कडून वसमत मध्ये रेती घेऊन येथे घेऊन येणारा हायवा क्रमांक एम एच २९ एम ०७४७ पोलिसांना आढळला हायवा मधील वाळू सह ९.७५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे
याप्रकरणी वसमत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सलग्न असलेले पोलीस हवालदार शंकर हेंद्रे यांच्या तक्रारीवरून शेख जावेद उर्फ बिलाल शेख अहमद ,राहणार सोमवार पेठ वसमत, कैफ फारुखी करीमोद्दीन फारुखी राहणार वसमत याच्या विरुध्द गुरुवारी गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बालाजी मिरासे, शेख नय्यर पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांची गस्त रात्रभर असते तरीही रेतीचे वाहन रात्रभर रेती घेऊन वसमत शहर व तालुक्यात येतात गस्ती पथकाला रेतीचे वाहन सापडत कसे नाही हा प्रश्न कायमच राहतो आहे हट्टा पोलीस ठाणे , कुरुंदा पोलीस ठाणे,वसमत ग्रामीण पोलीस ठाणे ,वसमत शहर पोलीस ठाणे ,तालुका गस्तीपथक, जिल्हा गस्ती पथक यासह भरारी पथकही कार्यरत असतात एवढे पथक असताना रेती माफिया बिंधास्त कसे आहेत याचा शोध घेण्याची गरज आहे अनेक दिवसानंतर वसमत पोलिसांना रात्री रेती घेऊन येणारे वाहन सापडले आहेत त्यामुळे पोलिसांचे अभिनंदन होत आहे आता तरी रात्रीची गस्त प्रभावी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.