दुरुस्त होईपर्यंत पाणीटंचाई चा फटका
विद्युत समस्येमुळेही पाणीपुरवठा होतोय खंडित
विद्युत समस्येमुळेही पाणीपुरवठा होतोय खंडित
वसमत (Wasmat Water supply) : वसमत शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन पुन्हा एकदा फुटली आहे. मुख्य पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने फुटत वसमत शहराला पाणीटंचाईचा फटका बसत आहे रस्त्याचे काम होत असताना खोदकाम करताना (Wasmat Water supply) पाईपलाईन फुटत असल्याच्या घटना घडत आहेत पाईपलाईन दुरुस्त होईपर्यंत शहराला पाणीपुरवठा होऊ शकणार असल्याने टंचाईचा फटका तीव्र होणार आहे.
वसमत पाणी पुरवठा योजनेच्या सिद्धेश्वरधरण पंपहाऊस ते वसमतशहरा पर्यंत मुख्य पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा होत असतो औंढा जवळ राष्ट्रीय महामार्गाचे काम होत आहे पुलाचे खोदकाम करताना नागेश वाडी जवळ शनिवारी रात्री वसमत कडे येणारी पाईपलाईन फुटली आहे. नगरपरिषद पाणी पुरवठा विभागातील दुरुस्तीपथका मार्फत सदरील पाईपलाईन दुरुस्ती चे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. (Wasmat Water supply) सदरील पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण होताच वसमत शहरात टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी नगर परिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी केले आहे.
विद्युतसमस्या ही डोकेदुखी
जलवाहिनी फुटणे व कमी दाबाने वीज पुरवठा होणे ह्या प्रकारामुळे वसमत शहरात पाणीटंचाईचा फटका बसत आहे. वसमत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर धरणावरील पंप हाऊसला गेल्या काही दिवसापासून कमी दाबाने विद्युत पुरवठा होत आहे. कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने धरणावरील मोटारी चालत विद्युत पंप 24 तासात काही तास बंद राहत असल्याने (Wasmat Water supply) शहराच्या पाणीपुरवठा अडचण निर्माण होत आहेत कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने पाणीपुरवठ्यात मोठी अडचण निर्माण होत आहे. शनिवारी सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत पंप बंद होता सायंकाळी पाच वाजेपासून पंप सुरू झाला सतत विद्युत पुरवठा कमी दाबाने मिळत असल्याने पाणीपुरवठा अडचण निर्माण होत आहे. वसमतच्या नागरिकांनी सहकार्य करावे लवकर तांत्रिक अडचण दूर होईल पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल, असे मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले.
भर उन्हात नगरपालिका कर्मचारी घेत आहेत परिश्रम
पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. तो सुरळीत करण्यासाठी (Wasmat Water supply) वसमत नगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे सर्व कर्मचारी मुख्याधिकारी निलेश सुंकेवार हे पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी भर उन्हात परिश्रम घेत असल्याचे पहावयास मिळत आहे सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत. याची जाणीव असल्याने मुख्याधिकारी निलेश सुंकेवार व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कर्मचारी सर्वजण भर उन्हात नागेशवाडी जवळ तळ ठोकून पाईपलाईन दुरुस्त करत आहेत.