Parbhani :- परभणीतील जिंतूर तालुक्यातील कोक गावातील नागरिकांना पुरवले जाणारे पाणी दूषित असल्याचे आरोग्य विभागाच्या (Department of Health) प्रयोगशाळेच्या अहवालातून उघड झाले आहे. जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, परभणी यांनी १७ ऑक्टोबर रोजी दिलेल्या अहवालानुसार, गावातील दोन ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये पिण्यास अयोग्य घटक आढळले असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
गावकर्यांमध्ये तीव्र संताप
यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळणार्या सरपंच व ग्रामसेवकावर कार्यवाहीची मागणी ग्रामस्थ करत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील कोक येथील गावात पाणी पुरवठा करणार्या जुन्या व उपसा नसलेल्या विंधन विहिरीतून दीर्घकाळ साचलेले शेवाळयुक्त दूषित पाणी(Contaminated water) गावात सोडण्यात आले होते. यामुळे गावातील शेकडो नागरिकांना अतिसार, उलटी, पोटदुखी, डोकेदुखी यासारखे आजार वाढत होते. यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकार्यांसह आरोग्य पथक गावात दाखल होऊन गावातील दोन ठिकाणची पाण्याचे नमुने घेतली होती. याची तपासणीसाठी प्रयोगशाळा परभणी येथे पाठवण्यात आले होते. यावेळी दोन्ही ठिकाणचे पाण्याचे नमुने सदोश आढळली असून पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. म्हणून गावातील नागरिकांचा जीवाशी खेळणार्या सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.