पो. स्टे. ला मिसिंग दाखल नाही अन् वैद्यकिय अहवालही आत्महत्या
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Rohda dead Body) : रोहडा येथे हाकेच्या अंतरावर तलावात अंदाजे वय ४५ वर्षीय एका अनोळखी इसमाचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढल्याची घटना आज १२ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली होती. मात्र अंढेरा पोलीस स्टेशनला एकही मिसींग दाखल नाही अन् वैद्यकिय अहवाल आत्महत्या असा प्राप्त झाल्यानें सापडलेले अनोळखी इसम आहे तरी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चिखली तालुक्यातील रोहडा येथे गावांच्या पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर रेणुका मातेचे देवस्थान आहे. या (Rohda dead Body) ठिकाणी एक लहानसे तलाव आहे या तलावात एका अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले असल्याने लगेच घटनास्थळी ठाणेदार विकास पाटील, दुय्यम ठाणेदार जारवाल, पोहेकाँ कैलास उगले, तथा होमगार्ड यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि तलावातील पाण्यावर तरंगलेल्या अनोळखी इसमाचे प्रेत तलावातून बाहेर आणले . आणि पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय चिखली येथे पाठविण्यात आला तेथील डॉक्टरांनी अहवाल दिला की ही आत्महत्या आहे.
असा अहवाल प्राप्त झाल्याने पोलिसांनी डायरी रिपोर्ट तपासला असता, (Rohda dead Body) गेल्या चार महिन्या पासून एकही पोलीस स्टेशनला हरविल्याची तक्रार दाखल नाही त्यामुळे परीसरातील एकाही गावातून इसम बेपत्ता झाल्याची तक्रार नसल्याने हा अनोळखी इसम आहे तरी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे पोलिसांनी पेपरच्या माध्यमातून जनतेला अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले होते मात्र सात दिवसाचा कालावधी संपूनही अद्यापर्यत इसम कोण या बाबत माहिती मिळाली नाही त्यामुळे पोलिसांना नाईलाजास्व प्रेताचे अंत्यसंस्कार करावा लागणार की काय असाही प्रश्न उपस्थीत होत आहे.