आखाडा बाळापूर (Hingoli crime) :- शेतीच्या कारणावरून सवतीसह सावत्र मुलींने पतीचा खून (Murder) केल्याची तक्रार पत्नीने दिल्याने मायलेकी विरूद्ध आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सवतीच्या नावे शेती करून दिल्याच्या कारणावरून पत्नीनेच मुलीच्या सहाय्याने पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे.
दोघींना केली अटक ..
आखाडा बाळापूर येथील दिगाबंर पांडुरंग हेंद्रे (वय 50वर्षे) असे मयताचे नाव आहे. याबाबत सविता दिगंबर हेंद्रे रा.आखाडा बाळापूर ह.मु.कोळगाव ता.हदगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सविता यांच्या नावाने 3एकर 8 गुंठे शेती का करून दिली, असे म्हणून सवत शीलाबाई ही पती दिगंबर व सवत सविता सोबत सतत भांडण करत होती. यावरूनच 6 मे रोजी आखाडा बाळापूर येथे राहत्या घरी सवत शीलाबाई व तीची मुलगी यांनी कशाने तरी गळा आवळून दिगंबर हेंद्रे यांचा खून केला असल्याचे फीर्यादीत नमूद करण्यात आले. सदर प्रकरणी सुरवातीला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदन (Autopsy)डॉक्टरांच्या अहवाल प्राप्त झाल्यानंतर याप्रकरणी सविता दिगंबर हेंद्रे फिर्यादीवरून सवत शीलाबाई हेंद्रे व तिची मुलगी मेघा दिगंबर हेंद्रे दोघीविरूद्ध.खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके, शिवाजी पवार करत आहे. दिगंबर हेंद्रे खून प्रकरणात बुधवार रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी दोन्ही मायलेकींना अटक करण्यात आली आसल्याच तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके, शिवाजी पवार यांनी सांगितले.