महागाव () : तुझ्या पतीला अपंगत्व प्रमाणपत्र काढून देण्याचे आमिष दाखवून एका २४ वर्षीय महिलवर जबरदस्ती करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या (Woman Abuse Case) प्रकरणी पिडीत महिलेने महागाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून संशयीत आरोपी गुन्हा दाखल करण्यात आला. विठ्ठल नथू जाधव (४७) असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी हा पिडीत महिलेवर वाईट उद्देशाने पाहून तुझ्यावर प्रेम करत असल्याची बतावणी करत होता. २० जून रात्री आरोपीने महिलेच्या घरी येवून जबरदस्तीने शारीरिक संबंध (Woman Abuse Case) प्रस्तापित केले. जर कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देवून आरोपी निघून गेला. असे अनेक वेळा शारीरिक संबंध केले. तुझ्या पतीला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयातून अपंगत्व प्रमाणपत्र काढून देतो असे आमिष दाखवून यवतमाळ येथे दाम्पत्यास स्वतःच्या वाहनाने नेले.
त्यावेळी पिडीत महिलेच्या पतीस दारू पाजून महिलेवर पुन्हा शारीरिक संबंध करण्याच्या प्रयत्न केला. परंतु महिलेने ही बाब घरच्यांना सांगेल म्हणून पिडीत महिलेने सुटका करून घरी परतली. या (Woman Abuse Case) प्रकरणी पिडीत महिलेने महागाव पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दाखल केले असून आरोपी विरुद्ध विविध कालामानाव्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.




