इंस्टाग्रामवर ओळखीचा आरोपीकडून गैरअर्थ
आरोपीस पोलिसांकडून अटक
वर्धा (Woman Assault Case) : इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर युवकाने ओळखीचा गैरसमज करत लग्नाची मागणी केली. पण, लग्नास नकार दिल्याने एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत तरुणीवर युवकाने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये (Woman Assault Case) तरुणी गंभीर जखमी झाली. ही घटना ३० जून रोजी बढे चौकालगतच्या रस्त्यावर घडली. पोलिसांनी आरोपी सौरभ क्षीरसागर (वय २६) रा. भूगाव जि. वर्धा ताब्यात घेत अटक केली.
खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत एका तरुणीची भूगाव येथील सौरभ क्षीरसागर याच्यासोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्याने तरुणीच्या सहज बोलण्याचा गैरअर्थ काढत लग्नाची गळ घातली. पण, तरुणीने त्याला लग्नास नकार दिला. बोलणे बंद केल्याने तो वारंवार फोन करून त्रास देत होता. सातत्याने पाठलाग करत होती. त्याने अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन केला आणि धमकी देत फोन ठेवला.
३० जून रोजी सायंकाळी घरी जाण्याकरिता दुचाकीजवळ जाताच सौरभ क्षीरसागर धावून आला आणि (Woman Assault Case) जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर धारदार शस्त्राने वार केले. आरडाओरडा केल्याने लोक धावून येताच सौरभने तेथून पळ काढला. लग्नास नकार दिल्याने सौरभने धारदार शस्त्राने वार केल्याने तरुणी गंभीर जखमी झाली. तरुणीला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी आरोपी सौरभ क्षीरसागर यास अटक केली. सौरभला दोन जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.