परभणीतील मानवत रोड रेल्वे स्थानकावरील प्रकार; अज्ञातावर गुन्हा दाखल..!
परभणी (Parbhani Railway Crime) : देवगिरी एक्सप्रेसने नांदेड ते सेलू असा प्रवास करत असताना मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ गर्दीचा फायदा घेत एका महिला प्रवाशाच्या गळ्यातून ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने लंपास केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता राठोड यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी या देवगिरी एक्सप्रेसने नांदेड ते सेलू असा प्रवास करत होत्या. मानवत रोड रेल्वे स्थानकावरुन गाडी सुटताच त्यांना गळ्यातील गंठण चोरीला गेल्याचे लक्षात आले. (Parbhani Railway Crime) अज्ञात चोरट्याने रेल्वेतील गर्दीचा फायदा घेत त्यांच्या जवळील सोन्याचे गंठण चोरले. या प्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
प्रवाशाजवळील साहित्य चोरीला
परभणी : पूर्णा ते परभणी असा राज्यराणी एक्सप्रेसने प्रवास (Parbhani Railway Crime) करत असताना प्रवाशा जवळील लॅपटॉप व इतर साहित्य मिळून ७१ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. किरण शेलार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्या विरोधात रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.