परभणीतील जिंतूर तालुक्यातील घटना…!
परभणी (Maratha Samaj) : मराठा समाजातील महिलांबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह व (Maratha Samaj) अश्लील पोस्ट केल्याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीवर दिनांक 9 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान परभणी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आरोपीस अटक करून कारवाई करण्यात आली.
घटने बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,फेसबुकवर असलेल्या सोपान उकंडे नामक व्यक्तीने (Maratha Samaj) मराठा समाजातील महिला बाबत अश्लील व आक्षेपार्ह पोस्ट केली होती यामुळे जिंतूर शहरातील मराठा समाजातील नागरिकांत संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत संबंधित प्रकरणामुळे शहरात व परिसरात मोठी खळबळ उडाली असून मराठा समाजातील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आरोपीने समाजाच्या महिलांविषयी अत्यंत घृणास्पद आणि अपमानास्पद अशा स्वरूपाचे लिखाण सोशल मीडियावर टाकले. हे कृत्य समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे असल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला होता यावेळी संतप्त मराठा समाजातील युवकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात दाखल झाले होते.
यावेळी संतोष शिंदे यांच्या फिर्यादीवरून सोपान उकंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी संतप्त मराठा युवकांनी यापुढे जर कोणी समाजाच्या महिला-पुरुषांविषयी अश्लील, आक्षेपार्ह किंवा अपमानास्पद कमेंट केली तर कायदा हातात घेण्याचा इशारा दिला. दरम्यान,रात्री उशिरा परभणी येथील स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी सोपान उकंडे यास ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे…!




